Israel Attack On Iran : इस्रायलचा इराणवर हल्ला;क्षेपणास्त्र डागल्याचा दावा

इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने गेल्या आठवड्यात त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्र डागली.

0
Israel Attack On Iran
Israel Attack On Iran

नगर : इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने गेल्या आठवड्यात त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला (Missile Attack) चढवला होता. इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्र डागली. इराणने रविवारी (ता.१४) पहाटे १७० ड्रोन, ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडली होती. आता इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे.

नक्की वाचा : मुंबईचा पंजाबवर निसटता विजय;शशांक आशुतोषची झुंज व्यर्थ

इस्फहान शहरात मोठे स्फोट (Israel Attack On Iran)

इराणच्या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इस्फहान शहरात मोठे स्फोट झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, हा इस्रायलने केलेला हल्ला होता. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र डागून त्यांना प्रत्युत्तर दिल्या ची चर्चा आहे. इस्रायलने शुक्रवारी (ता.१९) सकाळी इराणमधील अनेक शहरांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला. इराणच्या फार्स या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर स्फोट झाले आहेत. या स्फोटाचं कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याच इस्फहान प्रांतात इराणच्या न्यूक्लिअर साईट्स आहेत. याच भागात इराणचा युरेनियम विकास कार्यक्रम ही चालू आहे.

अवश्य वाचा : भारत लोकसंख्येच्या बाबतीत ठरला अव्वल;चीनलाही टाकले मागे

इस्रायलने इराणचा अणू कार्यक्रम बंद पाडण्यासाठीच केला हल्ला (Israel Attack On Iran)

इस्फहान प्रांतात झालेल्या हल्ल्यावरून दावा केला जात आहे की, इस्रायलने इराणचा अणू कार्यक्रम बंद पाडण्यासाठीच हा हल्ला केला आहे. इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावाही केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.१९) सकाळी काही व्यावसायिक विमानांनी पश्चिम इराणवरून जाताना कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा मार्ग बदलला. त्याचदरम्यान, इस्फहान प्रातांत स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले. दुबई एमिरेट्स आणि फ्लायदुबई एअरलाईन्सने स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.३० वाजता पश्चिम इराणच्या आसपास त्यांचा मार्ग बदलण्यास सुरुवात केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here