
Israel’s Attacks on Lebanon : नगर : अमेरिकेचा इराणसोबत युद्धविरामाचा (US-Iran Ceasefire) करार झाल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले (Israel’s Attacks on Lebanon) सुरूच ठेवले असून, बेरूत शहरावर जोरदार हवाई हल्ल्यांची मालिका पाहायला मिळाली. लेबनॉनवरील हल्ले थांबले तरच ते पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणाऱ्या चर्चेत सहभागी होतील, अशी भूमिका इराणनं घेतल्याची माहिती आहे. तसेच इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली आहे.
नक्की वाचा : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला मारहाण; पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हल्ले थांबले तरच पाकिस्तानमधील चर्चेत सहभागी होणार
अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली असली तरी या कराराबाबत अजूनही अनेक बाबी स्पष्ट नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी हा करार ‘नाजूक’ असल्याचे म्हटले आहे. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नव्या हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्याने या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर लेबनॉनवरील हल्ले थांबले नाही तर आम्ही प्रतिहल्ला करू अशी भूमिका इराणनं घेतली आहे. तसंच जर लेबनॉनवरील हल्ले थांबले तरच ते पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेत सहभागी होतील. अशी भूमिका इराणनं घेतल्याची माहिती आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
इराणकडून होर्मुज खाडी पुन्हा बंद (Israel’s Attacks on Lebanon)
युद्धविरामानंतर मध्य पूर्वेतील तणाव कमी होताना दिसला. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढला. इस्त्रायलने केलेल्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराण भडकला आहे. यासोबतच इराणकडून काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करण्यात आल्या. त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याने जगाला ज्याची भीती तोच निर्णय इराणकडून घेण्यात आला. इराणकडून थेटपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आली. यासोबतच मोठा इशारा देत इराणने म्हटले की, इराणची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही जहाजाने होर्मुज खाडी पार करू नये.


