ISRO : आश्रमशाळेतून थेट ‘इस्रो’ची वारी

ISRO : आश्रमशाळेतून थेट 'इस्रो'ची वारी

0
ISRO : आश्रमशाळेतून थेट 'इस्रो'ची वारी
ISRO : आश्रमशाळेतून थेट 'इस्रो'ची वारी

आल्हणवाडीच्या प्रगतीची अंतराळ अभ्यासासाठी निवड

ISRO : नगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता थेट अंतराळ (Space) संशोधनाचे धडे गिरवता येणार आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी आल्हणवाडी (Alhanwadi) (ता. पाथर्डी) येथील संत तुकाराम उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील (Sant Tukaram Higher Secondary School) प्रगती मच्छिंद्र ढवण (इयत्ता ११ वी) हिची निवड झाली आहे. या निवडीमुळे प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नक्की वाचा : माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल

खास दौऱ्यासाठी निवड

​वि.जा.भ.ज. प्रवर्गातील आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे या खास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे भेट देतील. तिथे त्यांना उपग्रह तंत्रज्ञान, रॉकेट प्रक्षेपण व भारताच्या अंतराळ मोहिमा जवळून पाहता येतील.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी संशोधन अधिक गतिमान करा : कृषीमंत्री भरणे

मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले अभिनंदन (ISRO)

​प्रगतीच्या या यशाबद्दल सहायक संचालक विनोद लोंढे, आश्रमशाळा निरीक्षक तुकाराम कातकडे, सहायक लेखाधिकारी संजय शेलार तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here