नगर : चांद्रयान ३ मोहीमेमुळे (Chandrayan-3) भारताच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला गेलाय. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) चांद्रयान-३ मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. या कामगिरीमुळे एक मोठा पुरस्कार इस्रोने आपल्या नावावर केला आहे.
नक्की वाचा : लोकसभेमुळे UPSC परीक्षा पुढे ढकलल्या;नवीन तारीख जाहीर
इस्रोला मिळाला एव्हिएशन वीक पुरस्कार (ISRO Award)
अवकाश क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा मानाचा जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी हा पुरस्कार ISRO ला देण्यात आला. “इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देश ठरला,” असं अधिकृत पुरस्कार वितरण सोहळ्याच्या घोषणेत म्हटलं होतं.
अवश्य वाचा : आई व मुलीमधील हळुवार नातं उलगडणार,’मायलेक’ चित्रपटातील’असताना तू’ गाणं प्रदर्शित
यात पुढे म्हटलं आहे, “अवघ्या ७५ मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे.”