ISRO SPADEX:इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत 

0
ISRO SPADEX:इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत 
ISRO SPADEX:इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत 

ISRO SPADEX: भारताने अवकाशात मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. इस्रोला स्पेडेक्स मिशनच्या (Isro Spadex Mission) डॉकिंगमध्ये (Docking) ऐतिहासिक यश मिळालय. इस्रोने पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले आहेत. भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश ठरला आहे. खरच भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी या यशासाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी!अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला 

स्पेडेक्स मिशनची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण (ISRO SPADEX)

भविष्यातील भारताच्या महत्वकांक्षी अवकाश मोहिमांसाठी हे एक महत्त्वाच पाऊल आहे.१२ जानेवारीला या मिशनची ट्रायल चाचणी पूर्ण झाली होती. इस्रोने या ऐतिहासिक यशासाठी आपल्या सगळ्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. स्पेडेक्स मिशनची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच  त्यांच्याकडून सांगण्यात आलं. हा एक ऐतिहासिक क्षण आहे.१५ मीटर ते ३ मीटर होल्ड पॉइंट पर्यंत आणण्याची प्रोसेस पूर्ण झाली. स्पेसक्राफ्टला यशस्वीरित्या कॅप्चर करण्यात आलं. अवकाशात यशस्वी डॉकिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. डॉकिंग म्हणजे अवकाशात कक्षेत दोन उपग्रहांना एकमेकांच्या जवळ आणणं, त्यांना जोडण्याची प्रक्रिया.

हेही पहा : ‘अहिल्यानगर महाकरंडकची जय्यत तयारी सुरु’

आधी दोन उपग्रहांमधील अंतर किती होतं? (ISRO SPADEX)

रविवारी १२ जानेवारीला स्पेडेक्स मिशनमधील दोन उपग्रह चेसर आणि टार्गेट परस्परांच्या खूप जवळ आले होते. दोन्ही सॅटलाइटला आधी १५ मीटर आणि नंतर ३ मीटरपर्यंत जवळ आणण्यात आलं होतं. याच्या एकदिवस आधी शनिवारी स्पेस डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पेडेक्स) मिशनमधील दोन उपग्रहांमधील अंतर २३० मीटर होतं. या आधी दोन ते तीनवेळा हा प्रयोग स्थगित करण्यात आला होता. या मिशनचा उद्देश अवकाशात डॉकिंग टेक्नोलॉजीच प्रदर्शन करणं होतं. भविष्यातील भारताच्या अवकाश मोहिमांसाठी ही टेक्नोलॉजी खूप महत्त्वाची आहे. आता हे मिशन अवकाश स्टेशन आणि चांद्रयान-४ च यश निश्चित करेल. इस्रोने या मिशनसाठी ३० डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन PSLV-C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रह लॉन्च केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here