Italy Parliament Fight : इटलीच्या संसदेत राडा;खासदारांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी  

इटलीमध्ये (Italy) एक धक्कादायक घटना घडली आहे. इटालियन खासदारांनी थेट संसदेत एकमेकांना लाथाबुक्यांनी हाणामारी (Fight) केली. जी-७ शिखर परिषदेसाठी (G7 Summit) इटली जागतिक नेत्यांचे स्वागत करण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली.

0
Italy Parliament Fight : इटलीच्या संसदेत राडा;खासदारांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी  
Italy Parliament Fight : इटलीच्या संसदेत राडा;खासदारांमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी  

नगर : इटलीमध्ये (Italy) एक धक्कादायक घटना घडली आहे. इटालियन खासदारांनी थेट संसदेत एकमेकांना लाथाबुक्यांनी हाणामारी (Fight) केली. जी-७ शिखर परिषदेसाठी (G7 Summit) इटली जागतिक नेत्यांचे स्वागत करण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. प्रदेशांना अधिक स्वायत्तता देण्याच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या योजनेवरून हा वाद सुरू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार जी ७ शिखर परिषदेच्या एक दिवस आधी ही घटना घडली.

नक्की वाचा :  नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

संसदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Italy Parliament Fight)

संसदेमध्ये जवळपास २० लोक एकमेकांना हाणामारी करत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. त्यांच्या हातात इटलीचा ध्वज असल्याचं पाहायला मिळाले आहे. या हाणामारीत काही खासदार जखमी झालेत. काही सेकंदामध्येच इटालियन संसदेचं आखाड्यात रूपांतर झाल्याचं दिसत आहे. इटलीतील खासदारांमधील हा राडा सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होतोय.

हेही पहा : गुंड गजा मारणेकडून सत्कार; खासदार नीलेश लंके वादात

इटलीत १३ ते १५ जूनला जी- ७ परिषदेचे आयोजन  (Italy Parliament Fight)

इटलीने १३ ते १५ जून दरम्यान जी- ७ परिषदेचे आयोजन केले आहे. हा गोंधळ १२ जूनच्या संध्याकाळी झाला. फाइव्ह स्टार मूव्हमेंट डेप्युटी लिओनार्डो डोनो आणि स्वायत्तता समर्थक नॉर्दर्न लीगचे प्रादेशिक व्यवहार मंत्री रॉबर्टो कॅल्डेरोली यांच्यात यावेळी बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. लिओनार्डोने रॉबर्टो यांच्या गळ्यात इटालियन ध्वज बांधण्याचा प्रयत्न केला. डोनोच्या स्टंटचा उद्देश रोमच्या त्या प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या योजनेचा निषेध करणे हा होता. परंतु या घटनेमुळे इटलीची एकता कमकुवत होऊ शकते असं सांगण्यात आले आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा शेअर केला जात आहे. या वादामुळे इटलीच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here