ITDP : राजूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

ITDP : राजूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

0
ITDP : राजूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
ITDP : राजूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

ITDP : अकोले: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Integrated Tribal Development Project) राजूर (ता.अकोले) अंतर्गत चालवल्या जाणार्‍या २१ शासकीय व १७ अनुदानित आश्रमशाळेतील केंद्रस्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या ४८९ मुले तर ५३४ मुली अशा एकूण १०२३ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन (Organizing Sports Competitions) करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्पस्तरीय क्रीडा समितीच्या अध्यक्ष तथा राजूर प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे (Devkanya Bokde) यांनी दिली.

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

१४, १७ व १९ वयोगटात स्पर्धा संपन्न होणार

शैक्षणिक संकुल मवेशी (ता.अकोले) येथे २५ ते २७ नोव्हेंबर, २०२५ अखेर संपन्न होणार्‍या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांबउडी, उंचउडी, धावणे, चालणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक या प्रकारात वय वर्षे १४, १७ व १९ वर्षे वयोगटात सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.

या स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समिती, स्वागत समिती, आरोग्य समितीसह  विविध प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा शिक्षकांसाठी प्रकल्पस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी गट, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या गटात प्रदर्शन आयोजित केले असून यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

आदिवासी विभागाचे विविध मान्यवर उपस्थित राहणार (ITDP)

मंगळवारी (ता.२५) उद्घाटन तर गुरुवारी (ता.२७) संपन्न होणार्‍या बक्षीस वितरण समारंभासाठी आदिवासी विकास विभागाचे विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या क्रीडा उत्सवासाठी अकोले तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्पस्तरीय क्रीडा समिती सदस्य सर्वश्री सहायक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर (प्रशासन), तुषार पवार (योजना), दीपक कालेकर, अंबादास बागुल (शिक्षण), लेखाधिकारी संजय सोनवणे, कार्यालय अधीक्षक सुनील मोरे, श्याम कांबळे, आदिवासी विकास निरीक्षक कमलाकर हंडीबाग, अनिल जोशी, कुलदीप पाटील व गंगाराम करवर यांनी केले आहे. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८ शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे  मुख्याध्यापक, शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक प्रयत्नशील आहेत.