ITI : जिल्ह्यातील आयटीआय मध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

ITI : जिल्ह्यातील आयटीआय मध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

0
ITI : जिल्ह्यातील आयटीआय मध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू
ITI : जिल्ह्यातील आयटीआय मध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

ITI : नगर : अहिल्यानगर येथील कै. माणिकराव नरसिंगराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सेनापती बापट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) पारनेर येथे सौर तंत्रज्ञ (Solar Technician), तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे (Lokneta Gopinath Munde) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथर्डी येथे मेकॅनिक इलेक्ट्रिक वाहन या नवीन अभ्यासक्रमांना प्रशिक्षण महानिदेशालय, नवी दिल्ली यांनी नुकतीच संलग्नता प्रदान केली आहे. इच्छुक उमेदवारांनी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी केले आहे.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

अपरंपरागत ऊर्जा स्रोतांचा प्रभावी व कार्यक्षम वापर (ITI)

सध्याच्या काळात पर्यावरणाची बिकट स्थिती व नैसर्गिक साधनसामुग्रीचा मर्यादित उपयोग लक्षात घेता, अपरंपरागत ऊर्जा स्रोतांचा प्रभावी व कार्यक्षम वापर होण्यासाठी हे नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमधून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून संबंधित संस्थेच्या समुपदेशन केंद्राला भेट देऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहेत.