Itihas Sanshodhak : आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक पुरस्कार पोपटलाल हळपावत यांना जाहीर

Itihas Sanshodhak : आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक पुरस्कार पोपटलाल हळपावत यांना जाहीर

0
Itihas Sanshodhak : आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक पुरस्कार पोपटलाल हळपावत यांना जाहीर
Itihas Sanshodhak : आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक पुरस्कार पोपटलाल हळपावत यांना जाहीर

Itihas Sanshodhak : नगर : यंदाचा आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक (Itihas Sanshodhak) पुरस्कार जामखेडचे नाणे संग्राहक इतिहास अभ्यासक पोपटलाल बन्सीलाल हळपावत यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे (Ahilyanagar Historical Museum) अभिरक्षक प्रा. डॉ. संतोष यादव (Santosh Yadav) यांनी दिली. श्रीमंत सरदार कै. आबासाहेब मुजुमदार यांच्या जन्मदिनानिमित्त संग्रहालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

अवश्य वाचा : सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

यावेळी प्रा. डॉ. यादव यांनी सांगितले की,

इतिहास संशोधक, शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार सरदार आबासाहेब मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले. त्यांचा भारतभरातील १०८ संस्थांशी विविध पदांचा संबंध होता. भारत इतिहास संशोधक मंडळाच्‍या चिटणीस पदावर ते २४ वर्षे कार्यरत होते. त्‍यांचा फारसी भाषेचाही व्यासंग होता. गायनोपयोगी अशा तीस हजार चीजांचा त्यांचा संग्रह होता. त्‍यांना अनेक व्‍यक्‍तींनी वाद्ये भेट दिली होती. या वाद्यांचाही त्‍यांनी संग्रह केला होता. हा संग्रह त्‍यांच्‍या वारसदारांनी डिजीटल स्‍वरूपात जपून ठेवला आहे.

नक्की वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य

आबासाहेब मुजुमदार यांना चित्र, शिल्प, ताम्रपट, पोथ्या जमविण्याचाही छंद (Itihas Sanshodhak)

आबासाहेब मुजुमदार यांना चित्र, शिल्प, ताम्रपट, पोथ्या इत्यादी जमविण्याचाही छंद होता. बाबूजी बुवा आव्हाड विद्यालयाच्या अध्यापिका सुरेखा चेमटे या आबासाहेबांच्या जीवनावर विद्यावाचस्पती संशोधन करत आहेत. आबासाहेब मुजुमदार यांचे पुणे येथे १६ सप्टेंबर १९७३ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आबासाहेब मुजुमदार इतिहास संशोधक पुरस्कार दिला जातो, असे त्यांनी सांगितले.