Jai Bajrang Vidyalaya : नगर : मुंबई (Mumbai) येथे बालरंगभूमी परिषद, मुंबई मध्यवर्ती शाखेतर्फे आयोजित व बालरंगभूमी परिषद (Balrangbhumi Parishad), अहमदनगर मध्यवर्ती शाखेतर्फे संचालित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेचे नुकतचे आयोजन करण्यात आले होते. नगरच्या जय बजरंग विद्यालय (Jai Bajrang Vidyalaya) संघाला उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अवश्य वाचा: ‘धर्माचं भांडवल करु नका’,इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी
विद्यार्थ्यांनी सादर केले लेझीम नृत्य
या स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत नगरच्या पाईपलाईन रस्त्यावरील आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. या सादरीकरणाला उत्कृष्ट पारितोषिक मिळाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व सहसचिव उमेश गांधी यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाला मराठी सिने अभिनेत्री नीलम शिर्के – सामंत, लेखक अमित बैचे व चित्रपट दिग्दर्शक अभिजीत दळवी उपस्थितीत होते.
नक्की वाचा: स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (Jai Bajrang Vidyalaya)
या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पाठक, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, सीमा साळुंके, सारिका माकुडे, मनिषा टेमकर, पल्लवी देठे, दत्तात्रेय कुंजीर, अमोल तोडकर, प्रमोद उबाळे, शिक्षकेतर कर्मचारी सचिन कुलट, गणेश कुसळकर यांनी परिश्रम घेतले.