Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना भाजपकडून ‘जय महाराष्ट्र’?; मिळणार नवी जबाबदारी

त्या बैठकीतून निघालेली निरीक्षणे आगामी लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या राजकीय महानाट्याची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत

0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | महाराष्ट्रात मागील पाच वर्षांपासून होत असलेल्या राजकीय खेळ्यांतील मुख्य सुत्रधारांपैकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एक असल्याचे सांगितले जाते. भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रात केलेल्या राजकीय प्रयोगांमागे तेच  प्रमुख सुत्रधार असल्याची चर्चा आहे. भाजप आता महाराष्ट्रासह देशातील आपली राजकीय भूमिका बदलू पाहत आहे. त्याचे पडसाद दिल्ली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या एका बैठकीत दिसून आले. ही बैठक व त्या बैठकीतून निघालेली निरीक्षणे आगामी लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या राजकीय महानाट्याची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.

नक्की वाचा : भंडारदरा परिसर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज

या बैठकीत देशातील सर्व लोकसभा मतदार संघांचा राज्यनिहाय आढावा घेण्यात आला. यात प्रत्येक राज्यातील भाजपच्या प्रतिनिधींनी आपला अहवाल सादर केला. या बैठकीत भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवायला लावण्याचे निश्चित केले आहे. यात वसुंधरा राजे सिंधिया पासून ते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत सर्वांची नवे समाविष्ठ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय खेळ्यांतील पैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच दिल्लीत बोलावून भाजप नवी राजकीय खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. त्यामागेही काही कारणे आहेत. 

माजी मुख्यमंत्री मैदानात
भाजपला सर्वच स्थरातील नेत्यांना संधी देण्याचा विचार या बैठकीत दिसून आल्याचे सांगितले जात आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक दिवसांपासून काम करत असलेल्यांना निवडणुकांत संधी देऊन भाजप स्वतःचा पाया अधिक भक्कम बनविण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून राज्यात नवीन नेतृत्वाला संधी देण्याची ही खेळी आहे. त्यामुळेच वसुंधरा राजे सिंधिया यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याची चर्चा आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपूर तालुक्याचे अतिवृष्टीचे साडेपाच कोटीचे अनुदान वर्ग

नाराजांची खदखद
भाजपच्या देशपातळीवरील नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील भाजप स्थितीबाबत नाराजीचा सूर आहे. मागील पाच वर्षांपासून हा नाराजीचा सूर वाढत असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भाजपने महाराष्ट्रात कोणत्याही प्रादेशिक पक्षाला बरोबर न घेता स्वतंत्र निवडणूक लढवावी, असे वाटत होते. त्यासाठी अमित शहा अधिक आग्रही होते. मात्र, फडवीसांनी मांडलेला राजकीय डाव व त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टाकलेला प्रतिडाव, फडणवीसांनी उलटलेला प्रतिडाव यामुळी राज्यातील राजकीय स्थिती बदलली. यातच शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये घेतल्याचाही परिणाम भाजपला महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील भाजपच्या विधानसभा निवडणुकांत दिसून आल्याची चर्चा आहे. यातच एकनाथ शिंदे व अजित पवार हे त्यांच्या समर्थकांसाठी जास्त जागा मिळाव्यात यासाठी भाजपवर राजकीय दबाव आणत आहेत. फडणवीसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या विनोद तावडेसह काहींना दुखावल्याचे सांगितले जाते. या नेत्यांनीही शहा व नड्डांकडे आपली खदखद व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांना राज्यात ठेवण्याऐवजी केंद्रात नेण्याची तयारी सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

अयोद्धेतील श्रीराम मंदिर
अयोद्धेतील श्रीराम मंदिर उभारणीचा उत्सव २२ जानेवारीला होणार आहेत. हा उत्सव मोठ्या प्रमाणात देशभरात करण्याची तयारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयामांकडून सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत श्रीराम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. या शिवाय देशाचे जगभरात वाढलेले स्थान, पाकिस्तानची खालावलेली आर्थिक व राजकीय स्थिती, देशातील वाढलेले उद्योगधंदे, काश्मिरची सुधारलेली स्थिती हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे राहणार आहेत. तरीही भाजपची स्थिती अधिक बळकट रहावी व नवीन नेतृत्त्व उदयास यावे, यासाठी माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवून अधिकाधिक जागा जिंकत भाजपला पुन्हा देशात एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी या बैठकीत रणनीती ठरविण्यात आली असल्याची चर्चा आहे. या बैठकीतील निरीक्षणे व ठरविलेली रणनीती फडणवीस बदलतात का, ते महाराष्ट्रात राहतील की केंद्रात जातील हे आगामी काळ ठरविणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here