Jainachary Guptinandiji Gurudev Maharaj : मानवता, प्रेम व सद्भावनेने एक राहून जातीयवाद दूर करा : जैनाचार्य श्री गुप्तिनंद गुरुदेव महाराज

Jainachary Guptinandiji Gurudev Maharaj : मानवता, प्रेम व सद्भावनेने एक राहून जातीयवाद दूर करा : जैनाचार्य श्री गुप्तिनंद गुरुदेव महाराज

0

Jainachary Guptinandiji Gurudev Maharaj : नगर : जैन समाजाच्या (Jain Society) चारीही पंथांचे संत अहिल्यानगरमध्ये एकत्र आले आहेत. आमचे कोणाशीही शत्रुत्व नाही. भगवान महावीर स्वामींच्या (Bhagwan Mahavir Swami) संदेशाचे पालन करून कोणाशीही शत्रुत्व करू नका. प्रत्येकात असलेले चांगले गुण पहा. अहंकार, जातीयवाद सोडा. मानवता, प्रेम व सद्भावनेने एक राहून जातीयवाद दूर करा. भारतमातेसाठी काम करा. अहिंसेने सर्वांवर विजय मिळवता येतो, असे आवाहन दिगंबर जैनाचार्य श्री गुप्तिनंद गुरुदेव महाराज (Jainachary Guptinandiji Gurudev Maharaj) यांनी केले.

नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

जयजयकार करून उपस्थितांनी घेतले दर्शन

जैनाचार्य गुप्तिनंद महाराज यांचे अहिल्यानगर शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाल्यावर जैन समाजाच्या वतीने सक्कर चौकात त्यांचे भक्तिभावाने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा व माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी जैनाचार्य गुप्तिनंद महाराज यांचे स्वागत करून पाय धुऊन पाद्य पूजा केली. यावेळी महाराजांचा जयजयकार उपस्थितांनी करून दर्शन घेतले.

अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे

संजय चोपडा म्हणाले,(Jainachary Guptinandiji Gurudev Maharaj)

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा… अशी म्हण आपल्याकडे आहे. आज आपल्या अहिल्यानगरमध्ये क्रांतिकारी संत जैनाचार्य श्री गुप्तिनंद महाराज यांचे शुभ आगमनाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. शहर वासीयांच्या वतीने व मझ्या प्रभागाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्याची भाग्य मला लाभले आहे. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी उपसभापती मीना चोपडा, नरेंद्र लोहाडे, महावीर बडजाते, अजय गंगवाल, संजय कासलीवाल, रवी बाकलीवाल, विपुल शेटिया आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुप्तिनंद महाराज यांची शक्करचौक ते आनंदधाम पर्यंत वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.