Jal Jeevan Mission : नगर : जलजीवन योजनेच्या (Jal Jeevan Mission) अपूर्ण कामाच्या आढावा बैठकीदरम्यान ठेकेदार आणि माजी सरपंच तथा ग्रामपंचाय सदस्य यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी ठेकेदाराने (Contractor) माजी सरपंचाच्या (Sarpanch) थेट कानशिलात लगावली. या घटनेमुळे संबंधित विभागात एकच गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी (ता.२४) रोजी घडली.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात
पाणी पुरवठा विभागात आढावा बैठकीचे केले होते आयोजन
पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेतील कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण यांच्यासह तालुका पातळीवरील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, जलजीवन पाणी योजना अपूर्ण असणार्या गावातील सरपंच यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.
अवश्य वाचा : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी
घटनेमुळे संबंधित विभागात एकच गोंधळ (Jal Jeevan Mission)
यावेळी संबंधित गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि पाणी योजनेचा ठेका घेतलेला ठेकेदार आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. योजनेचा आढावा सुरू असतांना ठेकेदार आणि संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्या अपूर्ण कामावरून वाद होताच ठेकेदाराने थेट ग्रामपंचायत पदाधिकार्याच्या कानशिलात लगावली. या घटनेमुळे संबंधित विभागात एकच गोंधळ उडाला.