Jal Jeevan Mission : पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जलजीवन च्या तपासणीसाठी दोन पथके; योजनेचा घेणार आढावा

Jal Jeevan Mission : पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जलजीवन च्या तपासणीसाठी दोन पथके; योजनेचा घेणार आढावा

0

Jal Jeevan Mission : नगर : जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजनेच्या कामांच्या तक्रारींची दखल घेत राज्याचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनीही आपल्या स्तरावरून दोन पथके तयार केली आहेत. संबंधित पथकांद्वारे योजनेच्या कामांची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर

जलजीवन योजनेच्या कामाबाबत अनेक तक्रारी

जलजीवन योजनेच्या कामाबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत. तसेच संसदेच्या सभागृहात खासदार नीलेश लंके यांनी योजनेच्या कामांची तक्रार केली होती. दिशा समितीच्या बैठकीतही योजनेच्या कामांची चौकशी करावी, असा ठराव करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जलजीवन योजनांच्या कामांचा आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.

अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!

गावात राबविण्यात आलेल्या योजनांची तपासणी (Jal Jeevan Mission)

या सर्व बाबींचा विचार करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी तक्रारीबाबत दखल घेतली आहे. याबाबत गावात राबविण्यात आलेल्या जल जीवन योजनांची प्राधान्याने तपासणी करण्यासाठी दोन पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. ही पथके गावागावात जाऊन कामाचा आढावा घेणार आहे.