Jan Aadhaar : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर ते पांढरीपुल घाट रस्ता मागील 3 ते 4 वर्षांपासून अत्यंत खड्डेमय झाला असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जन आधार (Jan Aadhaar) सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे., अन्यथा पंधरा दिवसांत शेंडी येथे रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता कुंदन दंडगव्हाळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, गणेश गारुडकर, शहबाज शेख, अशोक बनसोडे, सुरेश कसाब आदी उपस्थित होते. जेव्हा हा रस्ता बीओटी तत्त्वावर होता, तेव्हा संबंधित कंत्राटदार देखभाल करत होते. मात्र, विकासाची मुदत संपल्यानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला, परंतू या विभागाने रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
अवश्य वाचा : पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध: विखे पाटील
अनेक निष्पाप नागरिकांनी गमावले प्राण (Jan Aadhaar)
पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्याचे वर्गीकरण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे एमएसआयडीसी यांच्याकडे १९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले. परंतु त्यांनी अद्याप रस्त्याची दुरुस्ती सुरू केली नाही. दुसरीकडे, रस्ता त्यांच्या अखत्यारीत नसल्याचा हवाला देत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी टाळत आहे. या वादामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, असे ही निवेदन म्हटले आहेत.