Janaakrosh Morcha : नगर : साई सेवा पतसंस्थेमध्ये (Sai Seva Patsansath) अनेक ठेवीदारांनी (Depositor) आपल्या कमाईची पुंजी अडचणीत कामी यावी यासाठी जमा केली होती. परंतु अनेकांना आपल्या पैशांची आवश्यकता असताना ते मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या ठेवींची मुदत संपूनही ठेवी परत मिळत नाही आहेत. पतसंस्था प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जनआक्रोश मोर्चा काढला (Janaakrosh Morcha) होता.
नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण
हक्काचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार संतप्त
गोर गरीब कुटूंबातील ठेवीदार यांनी आपली आयुष्याची जमा पुंजी गोळा करून ठेव स्वरूपात ठेवली होती, काही ठेवीदारांनी मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी पै पै गोळा केली होती. घारगाव येथील एका ठेवीदाराने किडनी च्या ऑपरेशन साठी पैसे गोळा करून ठेव ठेवली होती. ऑपरेशन साठी ठेव मिळत नसल्याने सदर ठेवीदारावर आर्थिक संकट आले आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने सदर रुग्ण न्याय देता का कोणी अशी आर्त हाक देत आहे. मोल मजुरी करून ठेवलेले पैसे मिळत नसल्याने ठेवीदार चांगलेच संतापले होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
तहसीलदार व निबंधकाना दिले निवेदन (Janaakrosh Morcha)
सदर चेअरमन, संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापक उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. यांना काेण पाठीशी घालत आहेत याचा सुद्धा प्रशासनाने विचार केला पाहिजे. वेळो वेळी तारीख पे तारीख दिली गेली पण पैसे मिळत नसल्याने मोर्च्या काढण्यात आला. सर्व प्रथम तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांच्या दालनात जाऊन निवेदन दिले. यावेळी तहसीलदार साहेब यांनी निवेदन स्वीकारून लोकांना आश्वासित केले. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला. त्यानंतर जोरदार घोषणा देत मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अहिरे साहेब यांनी निवेदन स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित (Janaakrosh Morcha)
त्यानंतर ठेवीदारांनी दुय्यम निबंधक कार्यालय येथे मोर्चा वळवला. संपूर्ण परिसर घोषणांनी गजबजून गेला. यावेळी दुय्यम निबंधक साहेब या ठेवीदारांसमोर आल्यानंतर ठेवीदारांनी निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर ठेवीदारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी साहेबांनी सांगितले की मी सहकार आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार केला असून त्या दृष्टीने चौकशी चालू आहे. लवकरच जशी माहिती मिळेल तशी कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व सारंग पाचपुते व आशा ताटे यांनी केले. यावेळी डॉ पाचपुते, प्रीतम पाचपुते, शर्मिला निर्हाली, जुनेद शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात ठेवीदार उपस्थित होते.
आम्ही सर्व ठेवीदार एकत्र येऊन सर्वांना न्याय मिळेपर्यंत लढाई लढणार आहोत. दुय्यम निबंधक यांनी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर जर आमच समाधान झाल नाही, तर आम्ही शाखे समोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. त्याबाबत लवकरच ठेवीदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सारंग पाचपुते यांनी सांगीतले.
ठेवीदार आशा ताटे म्हणाल्या की साई बाबांचे नाव देवून चेअरमन संचालक मंडळ तशेच शाखा मॅनेजर यांनी संगण मताने शाखेत खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार केला आहे. लवकरच सहकार आयुक्त यांच्या दालनात जावून ठेवीदारांच्या व्यथा मांडणार आहोत.
शर्मीला निऱ्हाळी यानी आराेप केला की ठेवीदारांचे पैसे हडप करून संचालक मंडळ, चेअरमन, शाखा मॅनेजर यांनी विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांनी २०२१-२२,२०२२-२३,२०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ या आर्थिक वर्षात खरेदी-विक्री केलेले सर्व खरेदी दस्त रद्द करण्यात यावे. तसेच यांच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.



