नगर : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Pratisthan) वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची (Janasthan Award) घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर (Satish Vasant Alekar) यांना जाहीर करण्यात आला आहे. सतीश आळेकर यांची मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळख आहे.
नक्की वाचा : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार;उड्डाण मंत्रालयाचा निर्णय
गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्काराचे वितरण (Satish Alekar)
जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा मानाचा पुरस्कार असून १० मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (ता.२७) आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर, कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी याबाबत घोषणा केली. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे जनस्थान पुरस्काराचे स्वरूप आहे.
अवश्य वाचा : ‘मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही’- मनोज जरांगे
संतोष आळेकर कोण आहेत ? (Satish Alekar)
सतीश वसंत आळेकर हे पुण्याच्या थिएटर अकादमीचे संस्थापक सदस्य आहेत. महानिर्वाण (१९७४), महापूर (१९७५), अतिरेकी (१९९०), पिडीजात (२००३), मिकी अनी मेमसाहिब (१९७३) आणि बेगम बर्वे (१९७९) ही नाटक त्यांनी दिग्दर्शित केले आहे. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्यासमवेत ते आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककार मानले जातात. सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालक पदाच्या माध्यमातून केलेत.