Japan : अकोले : जपानमधील कादंबरीकार, संगीतकार (Musicians) रेईको साकानोई यांनी वीरगाव (ता.अकोले) शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शास्त्रीय संगीतातील (Indian Classical Music) एक बंदिश केलीच खेरीज जपानमधल्या (Japan) लोकगीताचे कर्णमधूर सूर वीरगाव शाळेत निनादले. त्यावर टाळ्यांचा गजर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
आयुष्यातल्या स्वयंशिस्तीचे विद्यार्थ्यांना सांगितले महत्त्व
सर्वांशी प्रेमाने वागा, निराश न होता स्वत:ला सतत आनंदी ठेवा, असा सल्ला देत जपानमधील लोकांच्या जेवणातील खाद्यपदार्थ, त्यांच्या आनंदी, दीर्घ आयुष्यामागील रहस्य उलगडून सांगताना आयुष्यातले स्वयंशिस्तीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांकडून तीन वचने घेत रेईको साकानोई यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. जपानमधील कादंबरीकार, संगीतकार आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योजक रेईको साकानोई यांनी नुकतीच वीरगाव शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी सहज सुंदर संवाद साधला. रेईको यांच्या बोलण्याचे प्रा. डॉ. मुग्धा महाले यांनी भाषांतर केले. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शैला भोईर, विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे यावेळी उपस्थित होते.
अवश्य वाचा : मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात
रेईको यांनी यावेळी विद्यार्थ्यांकडून तीन वचने घेतली (Japan)
रेईको यांनी यावेळी विद्यार्थ्यांकडून तीन वचने घेतली. आई-वडील, शिक्षक आणि आपल्या पूर्वजांचा सन्मान करू. समाजाने, देशाने मला काय दिले? याचा विचार करण्यापेक्षा मोठे होऊन आम्ही देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू, देशाबद्दल अभिमान बाळगू. पृथ्वी आपली सगळ्यांची आई आहे, आपण सारे तिची लेकरे आहोत. जगभरातील सर्व माणसांशी बंधुभावाने आणि प्रेमाने वागू. जपानमधील शाळेची वेळ, तेथील खाद्य संस्कृती, आनंदी जीवनाचे रहस्य याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची रेईको यांनी दिलखुलास उत्तरे दिली. जपानी संगीतकार असलेल्या रेईको गेली दोन वर्षे भारतीय शास्रीय संगीत शिकत आहेत. त्यांनी संस्कृतमधील गीत सादर करत सर्वांची मने जिंकली. शाळेला भेट देऊन आनंद झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. कंटाळा न करता मुलांसोबत सेल्फी, फोटो घेतले. रेईको यांच्या मागणीनुसार शाळेतील विद्यार्थिनीनी समूहगीत सदर केले. हार्मोनियमवर साथ देणार्या अबोली ढमाले हिचे त्यांनी कौतुक केले. मुग्धा महाले यांनी परिचय करून दिला. भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविक केले. भास्कर आंबरे यांनी आभार मानले. सुरेश आरोटे, रावसाहेब सरोदे, मीनल चासकर, वैजयंता आंबरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.