नगर : मराठा आरक्षणासाठी आज शनिवारपासून (ता.२०) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange patil) यांचा पायी मोर्चा (March On Foot) मुंबईकडे रवाना झाला आहे. २६ जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगेनी घेतला. अंतरवाली सराटी येथून निघण्याआधी जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे-पाटील यांचे डोळे पाणावले होते. यावेळी जरांगे भावुक (Emotional) झाल्याचं पाहायला मिळाले.
नक्की वाचा : मनोज जरांगेंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर येणार
शेवटी आम्हाला टोकाचा संघर्ष करावा लागणार : जरांगे (Maratha Reservation)
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, “सामंजस्याची भूमिका होती, म्हणून सरकारला ७ महिन्यांचा वेळ दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा सन्मान केला आहे. कुणबीच्या ५४ लाख नोंदी मिळाल्या असूनही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी घेत असलेल्या बैठकीत सामील कशाला व्हायचं ? शेवटी आम्हाला टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. जाणूनबुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळं करण्याचं सरकारचं स्वप्न दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना तीनवेळा वेळ वाढवून दिली. सरकारनं ५४ लाख लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र दिल्यास २ कोटी मराठ्यांच्या मुलांचं कल्याण होईल,” असं जरांगे-पाटील म्हणाले.
अवश्य वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरणात ‘त्या’ १०० ते १५० कुटुंबांना तूर्तास दिलासा
‘छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही’ (Maratha Reservation)
“मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची मुलं संपवण्याचा घाट घातला जातोय. मराठ्यांची मुलं आत्महत्या करत आहेत. तरीही, सरकार गांभीर्याने घेत नाही. उपोषणामुळे शरीर साथ देत नाही. पण, लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे,” असं म्हणताना जरांगे-पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.