Jarann Marathi Movie:’जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप ;गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले

0
Jarann Marathi Movie:'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप ;गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले
Jarann Marathi Movie:'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप ;गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले

Jarann Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ (Jarann Movie) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला.आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग (Pramotional song release) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले गाण्यात प्रमुख भूमिकेत (Jarann Marathi Movie)

सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला आहे. तर वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे. त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

नक्की वाचा :  बसचा कट लागताच महिलेचा चालक-वाहकाला चोप;व्हिडिओ व्हायरल 

गाण्यात नेमकं काय ? (Jarann Marathi Movie)

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यात आता या प्रमोशनल गाण्याने उत्कंठा वाढवली आहे. सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे. गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाची संकल्पना अधिकच स्पष्ट होत असून कथानकातील अस्वस्थ करणारी आणि विचारप्रवृत्त करणारी बाजू यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे.

अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी  

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत,ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.