Champions Trophy:भारताला मोठा धक्का!जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

0
Champions Trophy:भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
Champions Trophy:भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

नगर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा (Champions Trophy 2025) थरार यावेळी पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाल्याचे वृत्त बीसीसीआयने (BCCI) दिले. याचबरोबर भारताचा सुधारित संघ देखील जाहीर करण्यात आला आहे.

नक्की वाचा : माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभात ‘महाजाम’,वाहतुकीवर निर्बंध 

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर (Champions Trophy)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या खालच्या भागातील दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने बुमराहच्या जागी हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे.ही दुसरी आयसीसी स्पर्धा असेल ज्यात बुमराह दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. याआधी,पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातूनही बाहेर पडला होता, यादरम्यान त्याला पाठीच्या दुखापतीवर अखेर शस्त्रक्रिया करावी लागली होती.

अवश्य वाचा :  ‘अहो भुजबळ!तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केलीय’-तुषार भोसले   
 
जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये अखेरच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. पण अखेरच्या सामन्यात बुमराहच्या पाठीमध्ये वेदना होत असल्याने सामन्याबाहेर पडला आणि पुन्हा गोलंदाजीसाठी उतरला नाही.

बीसीसीआयने जसप्रीत बुमराहसह अजून मोठी माहिती दिली आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १५ सदस्यीय संघात यशस्वी जैस्वालच्या जागी फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. वरूण चक्रवर्तीला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी संघात संधी देण्यात आली आहे. सध्या वरूण चक्रवर्ती इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेत खेळत आहे, त्याला दुसऱ्या वनडेमध्ये भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे. तसेच यशस्वी जैस्वालसह मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा सुधारित संघ:(Champions Trophy)

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here