Jay Bhim New Song:’महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित

'महापरिनिर्वाण' हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. 

0
Jai bhim New song
Jai bhim New song

नगर : मागील काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर (Dr.Babasaheb Ambedkar)आधारित ‘महापरिनिर्वाण’ (Mahaparinirvan) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म्स निर्मित ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. 

नक्की वाचा : गुजरातला होम ग्राऊंडवर पराभवाचा धक्का;पंजाबला मिळाला दुसरा विजय 

नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाथा महापरिनिर्वाणमध्ये पाहायला मिळणार (Jay Bhim New Song)

आपले अवघे आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र हळहळला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. हे मन हेलावणारा क्षण टिपणारे नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निर्माता टीमने डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी  ‘जय भीम’ हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित केले आहे.

अवश्य वाचा : संघर्ष योद्धा’ चित्रपटातील ‘मर्द मावळा’ गाणे प्रदर्शित

‘जय भीम’ गाण्याला नंदेश उमप यांचा स्वरसाज (Jay Bhim New Song)

आशिष ढोले यांची संकल्पना आणि अमोल कदम यांनी शब्दबद्ध  केलेल्या ‘जय भीम’ या गाण्याला रोहन -रोहन यांचे संगीत लाभले असून या गाण्याला नंदेश उमप यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. उत्साहाने आणि उल्हासाने भरलेल्या या गाण्यात एक अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व या गाण्यातून अधोरेखित होत असून अतिशय जोशपूर्ण आहे.

xr:d:DAFvzVEvC2U:1488,j:6701780138625276101,t:24040507

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे सारे श्रेय अमोल कदम यांना जाते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व या गाण्यात मांडले आहे. त्याला रोहन-रोहन आणि नंदेश उमप यांनी उत्तम न्याय दिला आहे. मनाला उभारी देणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here