Jay Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार यांचं सूचक वक्तव्य

0
Jay Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार यांचं सूचक वक्तव्य
Jay Pawar : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार यांचं सूचक वक्तव्य

Jay Pawar :राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात (The Merger of the NCP) माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, पार्थ दादा असतील, बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटतंय की,आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील, असे जय पवार (Jay Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आता थांबली असली तरी काही दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

नक्की वाचा: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका; नक्की काय घडलं?

जय पवार पुढे म्हणाले की, जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते,आजही आम्ही एकमेकांशी बोलतो, असे म्हणत जय पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर अधिक बोलणे टाळले. विलिनीकरण हा राजकारणातील भाग आहे, त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही,असंही ते म्हणालेत.

‘बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी’ (Jay Pawar)

 बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, शरद पवार साहेब सुद्धा आग्रह करत आहेत की, निवडणूक बिनविरोध व्हावी. दादांचं काम अनेक वर्षे सर्वांनी पाहिलं आहे, सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्याही मनात निवडणूक बिनविरोध व्हावी हीच भावना आहे, असेही जय पवार यांनी म्हटले.

अवश्य वाचा: वडिलांचे अधुरे स्वप्न घेऊन निघाले अक्षय कर्डिले ;जनतेच्या विकासकामांना गती देणार का?

जय पवार पत्रकार परिषदेबाबतही बोलले (Jay Pawar)

जय पवार यांनी पत्रकार परिषद लांबणीवर पडण्याचं कारणही सांगितलं. ते म्हणाले की, पत्रकार परिषद न घेण्याचं काहीही कारण नाही, जे मुद्दे मला बोलायचे होते, त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे रोहित दादांनी आधीच सर्वांना सांगितले आहेत. मला जे मुद्दे बोलायचे होते ते पुन्हा कळालं की, रोहित दादांनी ते कव्हर केले आहेत. मला वाटतंय आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही, तोपर्यंत मी उगीचच लोकांच्या मनात मतभेद करायला नाही पाहिजे. जे आम्हाला वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी तुमच्या सर्वांसमोर स्पष्टता देईल, असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.