Jayakwadi Dam : जायकवाडीला सोडलेल्या पाण्याला स्थगिती द्या; संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन

Jayakwadi Dam : संगमनेर: भंडारदरा (Bhandardara Dam) व निळवंडे धरणातून (Nilwande Dam) जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यास तातडीने स्थगिती देण्याच्या मागणीसाठी संगमनेर येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

0
Jayakwadi Dam : जायकवाडीला सोडलेल्या पाण्याला स्थगिती द्या; संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन
Jayakwadi Dam : जायकवाडीला सोडलेल्या पाण्याला स्थगिती द्या; संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन

Jayakwadi Dam : संगमनेर: भंडारदरा (Bhandardara Dam)निळवंडे धरणातून (Nilwande Dam) जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यास तातडीने स्थगिती देण्याच्या मागणीसाठी संगमनेर येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यात आल्याने समन्यायी पाणी वाटप कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाने (Congress party) पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध दाखवत आंदोलन केले. थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

हे देखील वाचा : शिक्षकाने बनवला मतदार नोंदणीचा ‘वन नेशन-वन क्यू आर कोड’


जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याची बाब न्यायप्रविष्ट असताना आणि त्याची उच्च न्यायालयांमध्ये पाच डिसेंबर रोजी व सर्वोच्च न्यायालयामध्ये 12 डिसेंबर रोजी असताना कोणत्याही वस्तुस्थितीचा विचार न करता शासनाने पाणी सोडण्याचे चुकीचे आदेश देऊन पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. हे सोडलेले पाणी तातडीने बंद न केल्यास यावर्षीच्या टंचाई परिस्थिती तोंड देणे, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. नगर जिल्ह्यातील प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये यावर्षी सरासरी आठ ते दहा इंचापेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

नक्की वाचा : टी-२० च्या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालची यशस्वी वाटचाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here