Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष टळला; जायकवाडीच्या जलसाठा ६७ टक्क्यांच्या पुढे 

Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष टळला; जायकवाडीच्या जलसाठा ६७ टक्क्यांच्या पुढे 

0
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : नगर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे (Rain) नगर आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लाे झाली. परिणामी नगर-नाशिक धरणांमधून (Dam) आत्तापर्यंत तब्बल ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) साेडण्यात आला. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा ६७ टक्क्यांच्या पुढे गेला असून समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष यंदा टळला आहे. water distribution

नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

निळवंडेतून प्रवरानदीत ९४९९ क्युसेकने विसर्ग

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी ६५ टक्के न भरल्यास नगर-नाशिकमधील धरणांमधून विहित सूत्रानुसार पाणी सोडावे लागते. मागील दुष्काळी वर्षात तशी वेळ ओढावली होती. नुकतेच भंडारदरातून निळवंडेत ६७६६ क्युसेकने निळवंडेच्या दिशेने विसर्ग सुरू होता. निळवंडेतून प्रवरानदीत ९४९९ क्युसेकने विसर्ग काल सायंकाळी करण्यात येत होता.

अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …

मुळातून ६ हजार क्युसेकने विसर्ग (Jayakwadi Dam)

मुळातून ६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. नाशिकच्या नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत २७३४१ क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने साेडण्यात आला. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा वाढण्यात मदत हाेत आहे.