
Jayamala Solepatil : नगर : सहकारचे प्रचार, प्रसिद्धी, प्रशिक्षण देणारी पुणे येथील पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ मर्या. (Western Maharashtra Regional Cooperative Society Limited.) गुलटेकडी, पुणे या संस्थेच्या सन २०२४-२५ ते२०२९-३० या कालावधी पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकीत सौ. जयमाला भारत सोलेपाटील (Jayamala Solepatil) यांची सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघातून बिनविरोध संचालक पदी निवड झाली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी (Election Decision Officer) तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे श्री. मिलिद टांकसाळे यांनी अधिसुचना द्वारे निर्गमीत करून जाहीर केले.
अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
या जिल्ह्यातुन प्रतिनिधी सदस्य म्हणून निवड
पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ मर्या. गुलटेकडी, पुणे या संस्थेच्या संचालक मंडळात पुणे, सातारा, सांगली, रायगड, कोल्हापूर, धुळे, जळगांव, सोलापूर या जिल्ह्यातुन ही प्रतिनिधी म्हणून सदस्य निवडून आले आहेत.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न
सहकार महर्षी स्व. गोपाळराव सोलेपाटील यांच्या स्नूषा (Jayamala Solepatil)
अरणगांव ता जामखेड येथील सौ. जयमाला सोलेपाटील या सहकार महर्षी स्व. गोपाळराव सोलेपाटील यांच्या स्नूषा असून त्या अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बोर्डाच्या गेली वीस वर्षापासून संचालक असून सध्या विद्यामान चेअरमन म्हणून काम पाहात आहेत. अरणगांव येथील सहकार महर्षी गोपाळरावजी सोलेपाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक आहेत.
सौ. सोलेपाटील यांच्या बिनविरोध निवडबद्दल त्यांचे राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवर व सहकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.