Jayant Kulkarni : आनंदी शिक्षकच आनंदी शिक्षण देऊन आनंदी विद्यार्थी घडवू शकतो: जयंत कुलकर्णी

Jayant Kulkarni : आनंदी शिक्षकच आनंदी शिक्षण देऊन आनंदी विद्यार्थी घडवू शकतो: जयंत कुलकर्णी

0
Jayant Kulkarni : आनंदी शिक्षकच आनंदी शिक्षण देऊन आनंदी विद्यार्थी घडवू शकतो: जयंत कुलकर्णी
Jayant Kulkarni : आनंदी शिक्षकच आनंदी शिक्षण देऊन आनंदी विद्यार्थी घडवू शकतो: जयंत कुलकर्णी

Jayant Kulkarni : नगर : शाळेत विद्यार्थी (Student) हे उत्सुकतेने ज्ञान ग्रहणासाठी आतुर असतात. वर्गात जाण्या आधी शिक्षकांनी (Teacher) आपल्या मनाची सुंदर पूर्वतयारी केली तर त्याचा आनंद वेगळाच आहे. यासाठी रोज वेळ द्या. घरचा ताणतणाव शाळेत अणु नका तर शाळेतील ताणताणाव घरी नेऊ नका. मुलांची भाषा, मुलांचे भाव, मुलांच्या नजरा, या सगळ्या आपल्याला शिक्षक म्हणून वाचता व कळल्या पाहिजे. शिक्षक म्हणून मला जर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आधी आनंदी शिक्षक व आनंदी व्यक्ती होणे आवश्यक आहे. मग हा आनंदी शिक्षक आनंदी शिक्षण देऊन विद्यार्थी घडवू शकतो. जगाला हेवा वाटावा असा चांगला हा शिक्षक पेशा आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी विद्यापीठाचे (Deccan Education Society,Pune) संचालक जयंत कुलकर्णी (Jayant Kulkarni) यांनी केले.

अवश्य वाचा: गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं प्रदर्शित; समर्थकांनी केला कौतुकाचा वर्षाव

‘आनंदायी शिक्षण’ या विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन

डेक्कन एज्युकेशन सोसायटी विद्यापीठाच्या सहकार्याने अहिल्यानगर मधील हिंद सेवा मंडळाच्या शिक्षकांच्या ‘आनंदायी शिक्षण’ या विशेष कार्यशाळेत जयंत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. अनंत देसाई यांच्या पुढाकारातून झालेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत डेक्कन एज्युकेशन सोसायटी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेस हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.रमेश झरकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ॲड.अनंत फडणीस, संचालक सुमतीलाल कोठारी, डॉ. पारस कोठारी, प्रा. मकरंद खेर, मधुसूदन सारडा, जगदीश झालानी, प्रा. सुजित बेडेकर, सारडा महाविद्याल्याच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

हे देखील वाचा: 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’

जयंत कुलकर्णी पुढे म्हणाले, (Jayant Kulkarni)

विद्यार्थ्यातील कलागुण शोधा, त्यांच्या मनातील ओळखून त्यांचे जवळचे मित्र, मैत्रिणी, आई-बाबा होण्याचा प्रयत्न करा. वर्गातील तोंड पडलेल्या, कोमेजलेल्या चेहेऱ्याच्या नाराज विद्यार्थ्यांना केवळ नजरेने ओळखून त्याच्या पाठीवरती जर प्रेमाने थाप मारली तर मुलं फुलासारखी उमलून येतात. विद्यार्थ्याला शिक्षकाचं माझ्याकडे लक्ष असून त्यांच्या कोशामध्ये मला काहीतरी स्थान आहे, एवढं कळल तरी त्यांच्या मनात शिक्षकाप्रती जागा निर्माण होते. कार्याध्यक्ष डॉ.रमेश झरकर म्हणाले, आनंदायी पद्धतीने शिक्षण देणे खूप आवश्यक आहे.

नक्की वाचा: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; खासदार नीलेश लंके यांची माहिती

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारख्या नावाजलेल्या व प्रतिष्ठित संस्थेने आमच्या संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षित केल्याने या कार्यशाळेचे नक्कीच चांगले फलित होईल व आदर्श विद्यार्थी घडतील. कार्यशाळेचे संयोजक अनंत देसाई म्हणाले, शिक्षण क्षेत्रात आता खूप बदल होत आहेत. काळानुरूप पुढे जाण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या शिक्षकांना अधिक उत्तम प्रकारे ज्ञानदान करता यावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेत आपल्याबरोबर आली आहे. या माध्यमातून नक्कीच रचनात्मक कामे उभी राहून सकारात्मक परिणाम होणार आहे.

यासाठी पुण्याचे उद्योजक प्रमोद चौधरी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रीजलाल सारडा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी सारडा महाविद्यालयाचे प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य गिरीश पाखरे, मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदी उपस्थित होते.