Jayant Patil:’महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग’-जयंत पाटील

0
Jayant Patil:'महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग'-जयंत पाटील
Jayant Patil:'महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग'-जयंत पाटील

नगर : राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या वीज महाग मिळत असल्याचं ट्वीट करत आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे वीजदर (Electricity rate) कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

वीज बिलात ३०% कपात करणार,पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी,असं म्हणत त्यांनी हे ट्वीट केलंय.

नक्की वाचा : भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन होणार! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा  

हिवाळी अधिवेशनात वाढत्या वीजदराचा मुद्दा पेटणार (Jayant Patil)

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम हॅकिंगसह अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला घेरताना दिसत आहे. दरम्यान, राज्याची उपराजधानी नागपुरात येत्या १६ ते २१ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात वाढत्या वीजेचा मुद्दा विरोधक रेटतील अशी चर्चा आहे.

अवश्य  वाचा :  ‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित

जयंत पाटलांची पोस्ट काय ? (Jayant Patil)

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७. ५५ ते ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट ५.९० रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट ५. १६ ते १७.७९ रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here