Jayashree Thorat : संगमनेर : त्यांना येथे यायचे असेल तर ते येऊ शकतात, लोकशाही आहे. मात्र, त्यांना निराश होऊन मागे परतावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचे नाव न घेता केले. आपल्या वर्षभराच्या बाळाला आजीकडे ठेवून जयश्री थोरात (Jayashree Thorat) प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत.
नक्की वाचा: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाविकास आघाडी सत्तेत येणे सर्वात महत्त्वाचं
युवा संवाद यात्रेद्वारे पुढील बारा दिवस मतदार संघातील 145 गावांमध्ये मतदारांशी जयश्री थोरात संवाद साधणार आहेत, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. थोरात म्हणाल्या, माजी मंत्री थोरात यांनी मुख्यमंत्री व्हावे, हीच आमची इच्छा आहे. मात्र, आधी महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपला नेता राज्याच्या मोठ्या पदावर बसला पाहिजे. महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेसची जबाबदारी साहेबांवर देतील ती जबाबदारी योग्यपणे पार पाडतील, याचा मला विश्वास आहे. बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पद मिळालं तर आमच्यासाठी ती सर्वात आवडती गोष्ट. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे हे आमच्यासाठी आज महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा: खड्डे मुक्त शहराची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे : संग्राम जगताप
जयश्री उतरल्या वडिलांच्या प्रचारात (Jayashree Thorat)
तसेच आम्ही मन की बात करत नाही आम्ही चाय पे चर्चा करतो. युवकांचे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही युवा संवाद यात्रा सुरू केली आहे. या निवडणुकीत समोरचा विरोधी उमेदवार क्लीन बोल्ड होईल. थोरात यांचं मताधिक्य या वेळेला एक लाख पार असाच सर्वांचा निर्धार आहे. अवघ्या एक वर्षाच्या बाळाला घरी ठेऊन डॉ. जयश्री वडिलांच्या प्रचारात उतरल्या आहेत. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, माझी आई माझ्या बाळाचा सांभाळ करते. ज्याप्रमाणे जे संस्कार आम्हाला आमच्या आईने दिलेत तेच संस्कार माझ्या मुलालाही त्यांच्याकडून मिळतील याचा मला खूप आनंद आहे. मी रात्री जाते तेव्हा तो झोपलेला असतो. सकाळी निघते तेव्हाही झोपलेला असतो. त्यामुळे सध्या मुलाची आणि माझी भेट होत नाही. पुढचा काही काळ असाच असेल मात्र तोही मला समजून घेईल, असं मला वाटतं असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.