Jejuri Temple Dresscode:आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू! 

0
Jejuri TempleDresscode:आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू! 
Jejuri TempleDresscode:आता जेजुरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू! 

Jejuri temple Dresscode: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाच्या (Jejuri Khandoba Temple) दर्शनासाठी देश विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मात्र आता गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता (Dress Code) लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. विशेष म्हणजे ट्रस्टकडून त्यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा (Indian Costumes) परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान,जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

नक्की वाचा : महाकुंभमेळ्यात ४५ दिवसांत बोट व्यावसायिक कुटुंबानं कमावले ३० कोटी

कोणत्या कपड्यांवर असेल बंदी ? (Jejuri Temple Dresscode)


पुरूष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही,असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.जेजुरी देवस्थानचा हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठी लागू असेल. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असे कपडे घालून देव दर्शनाला गडावर येण्यास बंदी घातली जाणार आहे.गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत. त्यामुळेच, असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.

अवश्य वाचा :  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं स्मारक ‘या’ ठिकाणी उभारलं जाणार

महिला आणि पुरुषांसाठी सारखेच नियम (Jejuri Temple Dresscode)


महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत.दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे,असेही मंदिर ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे,महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हे नियम पाळावेच लागतील,असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

जेजुरीचा खंडेराया हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असून आराध्य दैवत आहेत. त्यामुळे,दरवर्षी येथे लग्नसराईनंतर आणि बारामाही देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. विशेष म्हणजे चंपाषष्टीला भाविक मोठ्या संख्येने गडावर दर्शनासाठी येतात. चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here