Jhaad Movie Teaser: झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित 

झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष 'झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. "झाड" या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. 

0
Jhaad Movie Teaser
Jhaad Movie Teaser

नगर : झाडे ही पर्यावरणासाठी अत्यावश्यक आहेत. हेच झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड’ (Jhaad Teaser) या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स (The Green India Films) यांनी केली आहे. 

नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले   

पर्यावरण संवर्धन चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न (Jhaad Movie Teaser)

निसर्ग चक्रामध्ये झाडांचं स्थान अनन्यसाधारण आहे. कारण फळे, फुलांवर अनेक प्रकारचे पक्षी अवलंबून असतात. मात्र माणसाने आपल्या हव्यासापायी प्रचंड प्रमाणात झाडे तोडली. त्यातून जंगलांचा नाश होऊ लागला आणि वन्यजीव, माणूस असा नवा संघर्ष उभा राहिला. जागतिक तापमान वाढीचा मुद्दा तापत असताना, उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. त्यामुळे झाडे लावणे, त्यांची जोपासना करणे, जंगले निर्माण करणे हाच उपाय आहे. म्हणूनच झाडांचं जतन-संगोपन आणि पर्यावरण संवर्धन हा विषय चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न झाड चित्रपटातून केला आहे. चित्रपटाच्या टीजर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नव्या दमाचे कलाकार, संपूर्णपणे वेगळा विषय हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. 

अवश्य वाचा : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू

२१ जून रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित (Jhaad Movie Teaser)

झाड या चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंग आप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास मोरे, जयदेव वायबसे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे,  माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आयन हजारे हे कलाकार झळकणार आहेत. २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

सचिन बन्सीधर डोईफोडे हे झाड चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. प्रशांत मुरकुटे सह-दिग्दर्शक व गणेश मोरे प्रमुख सहयोगी दिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, रंगभूषा, वेशभूषा केली आहे. शरद ठोंबरे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. पी. शंकरम यांनी या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. प्रल्हाद उजगरे यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शनाचं काम केलं आहे. तर आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here