Rahul Gandhi : राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा झटका ; त्या वक्तव्यावर याचिका फेटाळली 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. सन २०१८ मध्ये अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या प्रकरणात निर्णय देताना कोर्टानं गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

0
Rahul Gandhi
Rahul Gandhi

नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. सन २०१८ मध्ये अमित शहा (Amit Shah) यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या प्रकरणात निर्णय देताना कोर्टानं गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरुद्ध खटला चालवला जाणार आहे. राहुल गांधी यांनी एमपीएमएलए कोर्टाने बजावलेल्या समन्सला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. मागील सुनावणीत कोर्टाने या प्रकरणात आपला निर्णय राखून ठेवला होता.

नक्की वाचा : शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; आणखी १ शेतकऱ्याचा मृत्यू

अमित शहांबद्दल वादग्रस्त वक्तव्य (Rahul Gandhi)

राहुल गांधी यांनी सन २०१८ मध्ये बेंगळुरूत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. नंतर गांधी विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. राहुल यांनी ट्रायल कोर्टात सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर १६ फेब्रुवारीला त्यांनी बाजू मांडली होती. मात्र या सुनावणीत कोर्टाने यावरील निर्णय राखून ठेवला होता.

अवश्य वाचा : आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

यापूर्वी मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिल्याने गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here