Jhimma 2 song Marathi Pori Song :बाईपण जपणारं ‘झिम्मा २’ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘मराठी पोरी' हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्यातून सांगितली आहे.

0

नगर :  बहुचर्चित ‘झिम्मा २’ (Jhimma 2) चित्रपटाच्या टिझरने सगळीकडे ‘झिम्मा’ मय वातावरण निर्माण केले आहे. हेच वातावरण अधिक बहरण्यासाठी आता या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ (Marathi Pori) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे.

नक्की पहा : सुपरस्टार कमल हासनच्या ‘इंडियन-2’ चा टीझर प्रदर्शित 

‘मराठी पोरी’ या दोन शब्दांमध्येच या गाण्याचा भावार्थ कळतो. ‘इंदू’च्या ७५व्या वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन असून यात प्रत्येकीचा जबरदस्त स्वॅग दिसत आहे. ‘मराठी पोरी’ हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्यातून सांगितली आहे. तसेच कलाकारांच्या वेशभूषेने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे.

अवश्य वाचा :  भारतीय महिला हॉकी संघांची कमाल ; एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी  

गाण्याबद्दल संगीतकार अमितराज म्हणतात, ”प्रत्येकीची खासियत सांगणारे हे गाणे आहे. मुळात हे सेलिब्रेशनचे गाणे असल्याने तशा मूडचे संगीत असणे फार आवश्यक होते आणि त्या मूडला साजेसे असेच संगीत आम्ही दिले आहे. यातील कलाकारच इतके भन्नाट आहेत की, संगीतही त्या गाण्याला तितक्याच ताकदीचे हवे होते. क्षितिजच्या गाण्याचे बोलही खूप सुरेख आहेत. ज्यातून प्रत्येकीची ओळख होत आहे. मुळात या सात जणी म्हणजे इंद्रधनूतील सात रंग आहेत आणि हे सात रंग एकरूप झाल्याचा फील या गाण्यातून येतोय. मला खात्री आहे, हे गाणे करताना आम्हीही खूप एन्जॉय केले आहे. त्यामुळे प्रेक्षकही हे गाणे मनापासून एन्जॉय करतील.”

तर गायक आदर्श शिंदे म्हणतात, ”आमचे पायही हे गाणे गाताना आपसूक थिरकत होते. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे, उत्साह आणि आनंदाने भरलेले आहे. या गाण्याचे चित्रीकरणही कमाल झाले आहे.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे.