Jitendra Awad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन

Jitendra Awad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन

0
Jitendra Awad
Jitendra Awad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन

Jitendra Awad : कर्जत: शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी महाड मधील क्रांती स्तंभाजवळ मनुस्मृती दहन आंदोलन करत असताना महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त करून निषेध नोंदविला. कर्जत आरपीआय आणि भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार आव्हाड यांचा निषेध करीत त्यांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

हे देखील वाचा: शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकलपट्टी करावी; महसूलमंत्र्यांची मागणी

कर्जत आरपीआय आणि भाजपतर्फे निषेध (Jitendra Awad)

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चवदार तळ्याच्या काठी फाडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कर्जत आरपीआय आणि भाजपतर्फे निषेध आंदोलन झाले. सकाळी १० वाजता शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी बोलताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांनी आमदार आव्हाड यांच्या कृत्याने आंबेडकर अनुयायांचा अपमान झाला आहे. त्यांना आरपीआय अहमदनगर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असे म्हणत काल घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

नक्की वाचा : मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

आंदोलनात अनेकांचा सहभाग (Jitendra Awad)

भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी आमदार आव्हाडांच्या कृत्याने महाराष्ट्र राज्याची देशात शरमेने मान खाली गेली आहे असे म्हणत भाजपाच्यावतीने निषेध व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अनिल गदादे, गणेश पालवे, पप्पू धोदाड, किसान मोर्चाचे सुनील यादव, आरपीआयचे युवक शहराध्यक्ष सागर कांबळे आदींची भाषणे झाली. यावेळी गणेश क्षीरसागर, महेश तनपुरे, अमोल भगत, प्रशांत शिंदे, रामदास हजारे, सतीश पवार, नितीन भैलुमे, आकाश साळवे, रोहिदास आढाव, उमेश जपे, धनंजय आगम, बबन लाढाणे, अजित अनारसे, शरद मेहेत्रे आदी उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ अहमदनगर-बारामती रोडवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here