Jitendra Awhad : नगर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. राजकारणासाठी डाॅ. आंबेडकराच्या नावाचा वापर करणाऱ्या स्टंटबाज पुढाऱ्याची शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षातून हाकलपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून
मंत्री विखे पाटील म्हणाले,
‘भावनेच्या भरात आपण काय करतो. याचे भान राहिले नसलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहे. डाॅ. आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना या घटनेन दुखावल्या गेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचे सामाजिक, राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू केला आहे.
नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी
अतिशय खेदजनक प्रकार असल्याचा आरोप (Jitendra Awhad)
राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने, अशी कृत्य करून प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास करताना आमदार आव्हाड यांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुद्धा पुरली नाही, हे अतिशय खेदजनक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आमदार आव्हाड यांची तातडीने पक्षातून हाकलपट्टी केली पाहिजे, अशी मागणी करून, भाररत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे. हे चेहरे सुद्धा आज या घटनेमुळे राज्याला समजले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.