नगर : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा,अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह (vishwa hindu parishad) बजरंग दलाने (Bajrang Dal) दिला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असतानाच औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हिरो झाले,असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ?(Jitendra Awhad)

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचं? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा विषय वेगळा आहे. एकदाची ती कबर उखडा. दररोज तेच तेच बोललं जातंय. इथे हजारो विषय पेंडींग असताना केवळ औरंगजेबवर बोललं जातंय.इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही.औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे त्यांनी म्हटले आहे. आता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अवश्य वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का?(Jitendra Awhad)
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू,असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याआधी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली. यांना महाराष्ट्र जाळून टाकायचा आहे, त्यामुळे हे सर्व चालत आहे. रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का,अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का,हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का,असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले आहेत. या सर्व गोष्टीला सरकारचा देखील एक छुपा पाठिंबा आहे, असा आरोप देखील त्यांनी महायुती सरकारवर केला होता.