Jyoti Gade | नगर : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे स्वतः रस्त्यावर उतरून शहरासाठी काम करत आहेत. त्यांच्याप्रमाणे आपणही सर्वजण शहरासाठी योगदान देऊन अहिल्यानगरचे (Ahilyanagar) नाव देशात नेऊ. जसा रस्त्यावरील कचऱ्याचे निर्मुलन करतो तसेच ई कचऱ्याचे निर्मूलन होणेही आवश्यक आहे. या मोहिमेसाठी विचार भारतीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. सर्व नगरसेवकांनी या अभियानात सहभगी होत आपापल्या प्रभागात ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. यासाठी महापालिका पूर्णपणे सहकार्य करेल. आपल्या अहिल्यानगर शहराला पुढे नेण्यासाठी विचार भारतीने सुचवलेल्या ‘सहा’ संकल्पना योग्य असून त्यावर काम करू, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे (Jyoti Gade) यांनी केले.
हे वाचा – पारनेरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरची दारे उघडी
ई कचरा निर्मूलन मोहीम (Jyoti Gade)
शहर विकासासाठी विचार भारती संस्थेच्या वतीने सुचवण्यात आलेल्या सहा मुद्यांची सुरुवात शहरात ई कचरा निर्मूलन मोहीमेने होणार आहे. सोमवारी (ता.२३) राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या नियोजनासाठी गुरुवारी मनपा सभागृहात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधाव, आयुक्त यशवंत डांगे, विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे, उपायुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे व एनजीओचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी व विचार भारतीचे सदस्य उपस्थित होते.
अवश्य वाचा – पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या नितीनची निर्घुण हत्या; दोन गट रुग्णालयातच भिडले
धनंजय जाधव यांचे आवाहन
यावेळी उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, महापालिकेमध्ये आता चांगल्या विचाराने काम करणाऱ्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे भविष्यात शहरात चांगले विकास कामे करून दाखवू. विचार भारतीने सुचवलेल्या सहा संकल्पनांवर काम करून हे अभियान यशस्वी करू. महापालिका कायम विचार भारतीय बरोबर राहणार आहे. त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहेत त्या निश्चितच आम्ही पूर्ण करू, असे सांगून ई कचरा निर्मूलन अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, विचार भारती प्रेरणादायी विचारांचा जागर करत चांगल्या संकल्पना सुचवत आहे. त्यामुळे विचार भारती बरोबर काम करून ई कचरा निर्मूलन अभियान महानगरपालिकेमार्फत राबवले जाणार आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी शहरात प्रत्येक प्रभागात तसेच विविध ठिकाणी सेंटर उभारून सकळी १०ते सायंकाळी ६ या वेळेत हे अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातील जुने बंद पडलेले व अडगळीतील वापरात न येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे निर्मूलन होण्यासाठी या अभियानात सहभगी होत सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करून भविष्यात शहरामध्ये पुन्हा डीप क्लीन स्वच्छता अभियान मोहीम राबवली जाणार अये. यामध्ये सर्व नागरिकांनी, सर्व नगरसेवकांनी तसेच सामाजिक संस्थांनी हातात झाडू घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
रवींद्र मुळे म्हणाले…
रवींद्र मुळे म्हणाले, शहराचे जसे नाव बदलले आहे तसेच अहिल्यादेवी होळकरांना अनुरूप असेच नगर शहर होणे आवश्यक आहे. आपल्या शहराचा वैभवशाली व ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत जावा व त्यांनी तो जपावा यासाठीच विचार भारती प्रयत्नशील आहे. जसे हिवरे बाजार, राळेगण सिद्धी हे देशात आदर्श ठरली आहेत तसेच आपले नगर शहर ही आदर्श व्हावे यासाठी पुढील पाच वर्षात विचार भारती ने सुचवलेल्या सहा बिंदूंवर काम करायचे आहे, असे सांगून स्वच्छ व हरित अहिल्यानगर, सुरक्षित अहिल्यानगर, स्वयं अनुशासित अहिल्यानगर, स्व रोजगार युक्त अहिल्यानगर, सांस्कृतिक अहिल्यानगर व शासकीय योजना लाभीत अहिल्यानगर. या सहा महत्त्वाच्या मुद्यांचे विश्लेषण केले.
यावेळी विचार भारतीचे उदय भणगे यांनी ई कचरा निर्मूलन अभियान हे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त २३ फेब्रुवारीला नगर शहरातील विविध सेंटरवर राबवले जाणार आहे, असे सांगून अभियानाची सविस्तर माहिती दिली. पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे सुभाष अंभोरे यांनी ई-कचऱ्याचे निर्मूलन कशा पद्धतीने होते याची माहिती दिली. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तर वर चर्चा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक संपत बारस्कर, भाजपचे नगरसेवक निखिल वारे, अविनाश घुले यांच्यासह हरजीतसिंग वधवा यांनी विविध मुद्दे मांडून आयुक्त यशवंत डांगे व विचार भारतीच्या कार्याचे कौतुक करत या अभियानात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
हे पहा – विद्यार्थिनीच्या धाडसाला सलाम! स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळला…
बैठकीचे सूत्रसंचालन विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी केले. राजेंद्र तागड यांनी आभार मानले. यावेळी विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अरविंद पारगावकर, उद्योजक गौतम मुनोत, जितेंद्र बिहाणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



