नगर : पाकिस्तानसाठी हेरगिरी (Spying for Pakistan) करणारी हरियाणाची युट्युबर ज्योती मल्होत्राला (youtuber jyoti malhotra) पोलिसांनी अटक केली असून ती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.आता ज्योतीला पहिला दणका देण्यात आला असून तीचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद (Instagram account closed) करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की, ज्योतीने तिच्या व्हिडिओंद्वारे पाकिस्तानसोबत अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा सहभाग असल्याचा संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात २ ‘जिहादी’ बनले व्हाईट हाऊसचे सल्लागार!
ज्योतीचे इंस्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स (Jyoti Malhotra)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनलचे ३.७७ लाख सबस्क्राइबर आहेत तर इन्स्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत. तपासात असे दिसून आले की, ती २०२३ मध्ये कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर पाकिस्तानला गेली होती. तिथे तिची भेट पाकिस्तानी उच्चायोगाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याला अलीकडेच भारतातून हाकलून लावण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ‘एकवेळ देशात भाजप राहणार नाही मात्र काश्मीर आपलंच राहील’- उद्धव ठाकरे
ज्योतीचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त (Jyoti Malhotra)
ज्योतीचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे इन्स्टाग्राम अकाउंट उघडल्यावर, तिचे अकाउंट सस्पेंड केलेले दिसते. तिच्या अटकेनंतर, तिची बराच काळ चौकशी केली जात आहे. ज्योती मल्होत्रा परदेशात प्रवास करत असे आणि आलिशान हॉटेल्समध्ये राहत असे, जे प्रायोजित होते. तपास यंत्रणांनी तपासलेल्या नोंदींवरून असे दिसून आले आहे की, तिचा खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा जास्त होता.
हिसारच्या पोलिस अधीक्षकांनी कोणती माहिती दिली? (Jyoti Malhotra)
ज्योती मल्होत्राने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधी अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ती १२ दिवसांपासून पाकिस्तानात होती. पहलगाम हल्ल्यानंतर ती लाईव्ह आली आणि हसताना दिसली. या प्रकरणात, हिसारचे पोलिस अधीक्षक (एसपी) शशांक कुमार सावन यांनी माध्यमांना सांगितले की, आधुनिक युद्ध आता सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. पाकिस्तानी गुप्तचर एजंट सोशल मीडियावर प्रभावशाली लोकांना भरती करून त्यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय एजन्सीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ज्योती ला हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीतून अटक करण्यात आली. ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तान आणि एकदा चीनला प्रवास केला होता. ती पाकिस्तानी गुप्तचर एजंटांच्या संपर्कात होती.