
नगर : भारताने मंगळवारी बंगालच्या उपसागरात न्यूक्लियर पावर पाणबुडी INS अरिघातमधून ३,५०० किलोमीटर पल्ल्याच्या K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (K-4 ballistic missile) यशस्वी चाचणी (Successful test) केली आहे. हे प्रक्षेपण विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ करण्यात आले. भारताच्या समुद्राखालून क्षेपणास्त्र डागण्याच्या क्षमतेला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
नक्की वाचा: विवाहितेवर अत्याचार करत चिमुकल्याची हत्या करणाऱ्या नराधमाला अखेर फाशी;७ वर्षांनी मिळाला न्याय
क्षेपणास्त्राची क्षमता किती ? (K4 Missile Testing)

K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते पाणबुडीतून प्रक्षेपित करून दूरच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकेल. या चाचणीमुळे भारताच्या समुद्र-आधारित अणुप्रतिरोध क्षमतेला आणखी बळकटी मिळाली आहे. भारत आता जमीन, हवा आणि समुद्र—या तिन्ही माध्यमातून अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्याची क्षमता ठेवतो. हे क्षेपणास्त्र २ टनपर्यंत अणुबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. तर, K-मालिका क्षेपणास्त्रांमधील “K” हे अक्षर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे, ज्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अवश्य वाचा: ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर रिलीज; अक्षय कुमारचा डबल रोल
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये (K4 Missile Testing)

K-४ क्षेपणास्त्र हे जमिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या अग्नि-मालिकांवर आधारित एक प्रगत प्रणाली क्षेपणास्त्र आहे, जे पाणबुडीतून प्रक्षेपणासाठी तयार केले आहे. प्रक्षेपणाच्या वेळी क्षेपणास्त्र प्रथम समुद्राच्या पृष्ठभागातून बाहेर येते. त्यानंतर उड्डाण करत लक्ष्याकडे जाते. हे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे आणि अरिहंत-श्रेणीच्या पाणबुड्यांमधून डागले जाऊ शकते.K-४ला भारताच्या अणु त्रिकूटाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाते. यामुळे भारताची ‘डिटरन्स’ क्षमता मजबूत होते म्हणजेच संभाव्य शत्रूंवर हे मानसिक दडपण येते की, कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.
भारतीय लष्कराने २३ डिसेंबर रोजी आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या प्रगत आवृत्ती आकाश नेक्स्ट जनरेशनची ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये यशस्वी चाचणी केली होती.


