Kabaddi : नगर : वाडिया पार्क मैदानावर (Wadia Park Ground) सुरू असलेल्या ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी (Kabaddi) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने (Maharashtra) ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली.
नक्की वाचा: विखेंना विरोध करणाऱ्या भुतारेंची मनसेतून हकालपट्टी
महाराष्ट्राने मारली बाजी
क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. सुरवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला. पण महाराष्ट्राने त्याला प्रतिउत्तर देत १४व्या मिनिटाला पहिला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात २३-१२ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती.
हे देखील वाचा: पाथर्डी तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट
खेळाडूंची आक्रमक खेळी (Kabaddi)
दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करीत आपली आघाडी २६-१३ अशी वाढविली. यानंतर दिल्ली ने आपला आक्रमण आणखी धारदार करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत ही आघाडी २४-२८अशी कमी केली. शेवटी शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी २गुणावर आणली. त्यावेळी महाराष्ट्राचे ३ खेळाडू मैदानात शिल्लक होते. अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करीत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढविल्या. शेवटी सौरभ राऊत ने दिल्लीचे शिलकी ३ गडी टिपत दिल्लीवर लोण दिला आणि पंचानी सामना संपल्याची शिट्टी वाजविली.
काल (शुक्रवारी) माजी मंत्री आमदार राम शिंदे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर सह अनेक मान्यवर तसेच मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, जयंत वाघ आदींसह मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.