नगर : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने (Mumbai Kabutarkhana) बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील दादर (Dadar) इथं असणाऱ्या कबुतरखाना परिसरात गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली, याचाच परिणाम म्हणजे दादर परिसरात बुधवारी (ता.६) जैन समाजाने मोठं आंदोलन केलं. ‘जिओ और जिने दो’ अशी घोषणाबाजी करत त्यांनी पोलिसांशी देखील वाद घातलाय. मात्र ज्या मुद्द्यामुळं हा संपूर्ण वाद सुरू आहे, त्या कबुतरखान्यांचा मूळ इतिहास काय आहे ? तसेच जैन समाज या कबुतर खाण्यांवरून इतका आक्रमक का झालाय आणि कबुतर मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे का हेच जाणून घ्या, सविस्तर …
नक्की वाचा : वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूच नाव ‘वॉशिंग्टन’ कस पडलं ? नावामागचा किस्सा काय ?
या वादाची सुरवात पावसाळी अधिवेशनात झाली. कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तात्काळ मोहीम राबवावी,असे निर्देश राज्यसरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. कबुतरांच्या प्रचंड संख्येने या परिसरात वेगाने आजार पसार असल्याचे समोर आलं होत, त्यानंतर हे कबुतरखाने बंद करण्यात आले.
अवश्य वाचा : अमृता खानविलकरला मिळाला पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार!
इतिहास काय आहे ? (Kabootar Khana Controvercy)
दादरमधील कबुतरखान्याचा इतिहास ९२ वर्षांचा असून, १९३३ मध्ये दादरमध्ये कबुतरखाना सुरू करण्यात आला होता. हा कबुतरखाना हे जैन मंदिराकडून सुरु करण्यात आलेलं एक खाद्य स्थळ आहे. पूर्वीच्या काळात पक्ष्यांना खायला घालण्यासाठी प्लॅटफॉर्म किंवा घरासारख्या वाटणाऱ्या रचना उभारल्या जात, जिथं नियमितपणे धान्य ठेवलं जात असे. याच खाद्यगृहांच्या मोठ्या स्वरुपांना कबुत्रीया किंवा कबुतरखाने असं म्हटलं जाऊ लागलं आहे. जसा जसा काळ पुढे गेला तस तसे कबुतरखान्याला धर्मदाय स्थळांचं स्वरुप प्राप्त झालं. आजच्या घडीला मुंबईत ५० हून अधिक कबुतरखाने अस्तित्वात असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणं मुख्य शहरात आहेत. ज्यामध्ये दादर कबुतरखाना सर्वात जुनी वास्तू असून ती ‘दादर कबुतरखाना ट्रस्ट’कडून चालवली जाते.
कबुतरांना खायला देणं हे एक पवित्र धार्मिक कार्य असून, त्यामुळं पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी जैन धर्मात धारणा आहे.अमावस्येच्या दिवशी या कृतीला विशेष महत्त्वं दिलं जातं. फक्त जैनच नव्हे, तर इतर काही संस्कृतींमध्ये कबुतर म्हणजे पृथ्वी आणि अध्यात्मिक विश्वातील संदेशवाहक असून, त्यांना खाऊ घातल्यानं अध्यात्मिक उर्जेची अनुभूती होत परमात्म्याशी आपण जोडले जातो अशी धारणा आहे. त्यामुळे हे कबुतरखाने बंद केल्याने जैन समाजाची धार्मिक भावना दुखावल्याने हा समाज अधिक आक्रमक झालाय.
कबुतरांचा मानवाला काय त्रास होऊ शकतो ? (Kabootar Khana Controvercy)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. ‘कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, त्यामुळे अस्थमा देखील होण्याची शक्यता असते.