नगर : उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण ‘कैरी'(Kairee Movie) हा बिगबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरच्या उत्सुकतेनंतर यांत आता भर घालत ‘कैरी’ चित्रपटाचा ट्रेलर (Trailer Release) समोर आला आहे. अनेक टर्न ट्विस्ट असलेला हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. या सिनेमातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता ट्रेलरने वाढविली आहे.
नक्की वाचा: महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’
ट्रेलरमध्ये नेमकं काय ? (Kairee Movie Trailer)
ट्रेलरमधून समोर आलेलं कोकणातील नयनरम्य, हिरव्यागार वातावरण झालेलं हे ‘कैरी’ चित्रपटाचं शूट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच शशांक आणि सायलीची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कोकणाच्या हिरव्यागार परिसरात त्यांचा रोमँटिक प्रवास खुलताना दिसत आहे. इतकंच नाहीतर कोकणातील लग्नाचा थाटमाटही चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. या जोडीच्या रोमँटिक प्रवासाला अचानक ब्रेक लागला. हो,ट्रेलरमध्ये मध्येच आलेला हा टर्न चित्रपटाच्या कथेची उत्सुकता वाढवत आहे. नवरा हरवला म्हणून पत्नीची सुरु असलेली घालमेल ट्रेलरमध्ये दिसत असून हा ट्विस्ट चित्रपटात काय रंगत आणणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
अवश्य वाचा: एलपीजी,पेन्शन ते विमान प्रवास,१ डिसेंबरपासून लागू होणार मोठे बदल
१२ डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित (Kairee Movie Trailer)

ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी आहे. तर शूटिंगची ठिकाणही नजरा वळवणारी आहेत. . ‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी’ हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे.



