Kajal Guru : तृतीयपंथीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांचे निधन

Kajal Guru : तृतीयपंथीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांचे निधन

0
Kajal Guru : तृतीयपंथीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांचे निधन
Kajal Guru : तृतीयपंथीय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांचे निधन

Kajal Guru : नगर : तृतीयपंथीय (Transgender) नागरिकांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू (Kajal Guru) उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा आजाराने निधन (Death). गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालात उपचार सुरू होते. काजल गुरू यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तृतीयपंथींना अनेक हक्क मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. त्यांच्या मृत्यूने तृतीयपंथीय आवाज थांबला अस म्हंटले जाते आहे.

अवश्य वाचा : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – प्रताप सरनाईक

समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवला

काजल गुरु या अहिल्यानगर मधील तृतीयपंथी समाजाच्या एक महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्या तृतीयपंथीय समाजाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी समाजाच्या हक्कांसाठी आणि समस्यांसाठी आवाज उठवला. त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सक्रियपणे सहभाग घेतला.

नक्की वाचा : सुपा येथे विमानतळ उभारा; खासदार नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

तृतीयपंथीय समाजात शोककळा (Kajal Guru)

काजल गुरु तृतीयपंथीय समाजाच्या समस्यांवर आवाज उठवला आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले. मात्र आज त्यांचे निधन झाले, ज्यामुळे तृतीयपंथीय समाजात शोककळा पसरली. काजल गुरु तृतीयपंथीय समाजात खूप लोकप्रिय होत्या आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाते.