Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे रविवारी वितरण

Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे रविवारी वितरण

0
Kakasaheb Mhaske
Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे रविवारी वितरण

Kakasaheb Mhaske : नगर : माजी आमदार कै. कि.बा उर्फ काकासाहेब म्हस्के (Kakasaheb Mhaske) यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्मृती पुरस्काराचे (Memorial Award) वितरण रविवारी (ता. ५) सकाळी १० वाजता बोल्हेगाव फाटा येथील काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत (Press conference) केली.

नक्की वाचा: देशात उष्णतेचा स्फोट! ‘या’ राज्यात आठ दिवस राहणार उष्णतेची लाट

डॉ. म्हस्के पुढे म्हणाले की (Kakasaheb Mhaske)

यंदाचा शिक्षणभूषण पुरस्कार नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक समुहाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांना, वृत्तभूषण पुरस्कार नगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहनीराज लहाडे यांना, समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांना, साहित्यभूषण पुरस्कार टाकळी खातगाव (ता. नगर) येथील साहित्यिक गीताराम नरवडे यांना, तर आरोग्य भूषण पुरस्कार ब्राम्हणवाडा (ता. अकोले) येथील डॉ. हबीब शेख यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्येष्ठ कृषितज्ज्ञ कै. भास्करराव म्हस्के यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा कृषिभूषण हा विशेष पुरस्कार कृषी क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे विजेते, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. सचिन जगताप यांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. म्हस्के यांनी दिली.

हे देखील वाचा: मी यादी दिली, तर फिरणं मुश्किल हाेईल; शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर जाेरदार हल्लाबाेल

सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण (Kakasaheb Mhaske)

आळंदी येथील डॉ. नारायण महाराज जाधव हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी आमदार लहू कानडे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, अॅड. राहुल म्हस्के आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच सायंकाळी काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलात सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here