Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले : डॉ. सर्जेराव निमसे

Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले : डॉ. सर्जेराव निमसे

0
Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले : डॉ. सर्जेराव निमसे
Kakasaheb Mhaske : काकासाहेब म्हस्के यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले : डॉ. सर्जेराव निमसे

Kakasaheb Mhaske : नगर : माजी आमदार काकासाहेब म्हस्के (Kakasaheb Mhaske) यांनी गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले. राजकारणातील अजातशत्रू, सालस आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे व्यक्तीमत्व होते. कृषि, जलसंधारण (Water Conservation), आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. दुष्काळ निवारणासाठीचे त्यांचे कार्य राज्यात आदर्शवत असून ते नगर तालुक्याचे विकासपुरुष असल्याचे प्रतिपादन नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे (Dr. Sarjerao Nimse) यांनी व्यक्त केले. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी जलसंधारणाचे काम करत विक्रमी पाझर तलावांची उभारणी केली यातून त्यांची दूरदृष्टी समजते, असेही ते म्हणाले.

नक्की वाचा : ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशोब होणार’-बजरंग सोनवणे

काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार सोहळा

काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉ.निमसे बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद शहा, जागतिक आरोग्य संघटनेचे माजी प्रतिनिधी डाॅ.सुभाष साळुंखे, विश्वस्त डॉ.सुमती म्हस्के, विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉ.दिप्ती ठाकरे, सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे,  डॉ.केतकी म्हस्के, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल काॅलेजचे प्राचार्य डॉ.विवेक रेगे, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा.नितीन ठुबे, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार, डॉ.भास्करराव पालवे, डॉ. उत्तमराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर

काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण (Kakasaheb Mhaske)

याप्रसंगी डॉ. निमसे आणि मान्यवरांच्या हस्ते काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे संस्था आवारात अनावरण करण्यात आले. तसेच जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ.विनोद शहा यांना आरोग्य भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. काकासाहेब म्हस्के यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा आनंद वाटत असून म्हस्के फाउंडेशन आणि परिवाराने पुरस्कार देत माझ्यासह जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचा केलेला गौरव आम्हाला पाठबळ आणि प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले.


यावेळी डॉ.सुभाष म्हस्के म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची दारे काकासाहेब म्हस्के यांच्या विचारांमुळे खुली झाली. राजकारण विरहित त्यांचे कार्य होते. समाजकारणासह सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या विचारांचा वारसा समृध्दपणे पुढे नेण्याचे काम त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या माध्यमातून घडत आहे. त्यांचा वारसा आणि विचार असाच अविरतपणे सुरु राहील, अशी ग्वाही त्यांनी त्यांनी यावेळी दिली.


पुरस्कार सोहळ्यानंतर वंध्यत्व निवारण या विषयावर इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.केतकी म्हस्के, वैद्य ज्योती तनपुरे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.अमोल राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.