Kalasharohan | श्री गोरक्षनाथ गड मंदिर कलशारोहण सोहळ्याचा प्रारंभ दिंडी सोहळ्याने उत्साहात

0

Kalasharohan | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गड मंदिराच्या कलशारोहण (Kalasharohan) कार्यक्रमाचा प्रारंभ दिंडी सोहळ्याने मोठ्या भक्तिभावात व उत्साहात झाला.

नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन

कलशरोहण मिरवणूक (Kalasharohan)

या दिंडीसोहळ्यात नाथसंप्रदायाचे हजारो भक्त टाळ-मृदुंग, लेझीम, पताका आणि भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले. “जय गोरक्षनाथ”च्या जयघोषात वातावरण दुमदुमले. कलशरोहण मिरवणूक २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होऊन २ मार्चपर्यंत विविध गावांतून प्रवास करीत गोरक्षनाथ गडावर आगमन करणार आहे. प्रत्येक गावात भाविकांकडून या पालखीचे स्वागत भक्तिभावाने, फुलांनी आणि नामस्मरणाने करण्यात येत आहे. गावोगावी धार्मिक उत्साह आणि नाथसंप्रदायाची पताका फडकताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘भिताड’ कादंबरीत समाजातील वास्तव चित्रण; समीक्षक डॉ. सुधाकर शेलार यांचे मत

कार्यक्रमांचे आयोजन (Kalasharohan)

कलशरोहण सोहळ्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्च रोजी दिंडीसोहळा श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर पोहोचणार असून त्यानंतर त्रिदिनीय सप्ताह सोहळ्याची सांगता ७ मार्च रोजी कलश पूजनाने होणार आहे.

त्रिदिनीय हरिकीर्तन सप्ताह (Kalasharohan)

कलशारोहण कार्यक्रम निमित्त आयोजित त्रिदिनीय हरिकीर्तन सप्ताह पुढीलप्रमाणे पार पडणार आहे – ४ मार्च (बुधवार) : जगन्नाथ महाराज पाटील (मुंबई), ५ मार्च (गुरुवार): श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी), ६ मार्च (शुक्रवार) : गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री (डोंगरगाव आश्रम), ७ मार्च (शनिवार): सकाळी १० वाजता गुरुवर्य महंत रामगिरी महाराज (सरला बेट) यांच्या हस्ते कलशपूजन कार्यक्रम व काल्याचे कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये वारकरी संप्रदायातील संत, कीर्तनकार आणि स्थानिक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

हे पहा – स्पा माफियांचे धाबे दणाणले! एका मृत्यूनं पोलीस कारवाईवरच प्रश्नचिन्ह?

या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शंकरराव कदम आणि सचिव गोरक्षनाथ कदम यांनी माहिती दिली की, श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडाच्या कलशरोहण सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि नाथपरंपरेचा संगम घडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here