Kalbhairavnath : आगडगाव येथे काळभैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात

Kal Bhairavnath : आगडगाव येथे काळ भैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात

0
Kal Bhairavnath : आगडगाव येथे काळ भैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात
Kal Bhairavnath : आगडगाव येथे काळ भैरवनाथ जन्मोत्सव उत्साहात

Kal Bhairavnath : नगर : जेथे वर्षानुवर्षे अन्नदान होते, लोक तृप्त होतात, तेथे सकारात्मक ऊर्जा अधिक तयार होते. काळभैरवनाथ (Kalbhairavnath) देवस्थानाजवळ सुरू असलेल्या अन्नदानाच्या यज्ञामुळे प्रत्येक वर्षी लाखो लोक समाधानी होत आहेत. या भूमित गोशाळेत गोसेवा होते. देवस्थानाजवळ आल्यानंतर मोठी सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवते. अन्नदान (Annadaan) हे पुण्याचे कर्म आहे. प्रत्येक मनुष्याच्या हातून ते व्हावे, असे मत रामायणाचार्य पारस महाराज मुथा (Paras Maharaj Muttha) यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : ‘खाशाबा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स

कीर्तन सेवेत त्यांनी अन्नदानाचे महत्त्व केले विषद

आगडगाव (ता.अहिल्यानगर) येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ सुरू असलेल्या सप्ताहाची सांगता मुथा महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी कीर्तनातून त्यांनी प्रबोधन केले. कीर्तन सेवेच्या दरम्यान त्यांनी अन्नदानाचे महत्त्व विषद केले. आगडगावजवळ गेल्या अनेक वर्षांपासून बाजरीची भाकरी आमटी हा उपक्रम सुरू आहे. त्याची महती आता परदेशातही पोहोचली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अवश्य वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य

हजारो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ (Kalbhairavnath)

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा झाला. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, गौरव भंडारी, गणेश आव्हाड आदींच्या हस्ते महापूजा झाली. महिलांनी पाळण्यात देवाचे फोटो ठेवून पाळणा गायला. या दिवशी दुपारी सुरू झालेला महाप्रसाद रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होता. हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. परिसरातील आगडगाव, देवगाव च्या महिलांनी पोळ्या बनविण्याची सेवा दिली. जन्मोत्सवाच्या दिवशी दुपारी महाआरतीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. कीर्तनानंतर मान्यवरांचे सत्कार व काठ्या मिरवणूक कार्यक्रम झाले. रात्री बारा वाजता काशीहून तसेच कायगाव टोका येथून भाविकांनी आणलेल्या जलाने नाथांना अभिषेक घालण्यात आला. महिलांनी पाळणे म्हटले. या उपक्रमात पंचक्रोशीतील महिलांचा सहभाग होता.