Kalbhairavnath : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव

Kalbhairavnath : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव

0
Kalbhairavnath : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव
Kalbhairavnath : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव

Kalbhairavnath : नगर : आगडगाव येथील काळभैरवनाथांची (Kalbhairavnath) यात्रा रविवारी (ता. २०) भरणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे (Religious Program) आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्ट व आगडगाव (Agadgaon), टोकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.

अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

मान्यवरांच्या हस्ते महाआरती

सालाबादप्रमाणे रविवारी सकाळी गंगेहून आणलेल्या कावडीची मिरवणूक, देवाला गंगाजलाभिषेक होईल. यावेळी होणाऱ्या अन्नदानासाठी एका भाविकाकडून गुप्तदान करण्यात आले आहे. आमदार शिवाजी कर्डिले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशिष पोखरणा, गणेश आव्हाड, गौरव भंडारी, सचिन दुसुंगे आदींच्या हस्ते महाआरती होईल. दुपारी १२ वाजता महाआरतीनंतर होणारे अन्नदान महेश देशमुख व परिवाराने केले आहे. सायंकाळी सात वाजता कल्याण काळे महाराज यांचे कीर्तन होईल. त्यानंतर यात्रोत्सवाची काठ्यांची मिरवणूक होईल. दरम्यानच्या काळात हमीद सय्यद सोंगी भारूड सादर करतील.

नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी हगामा होणार (Kalbhairavnath)

यात्रोत्सवानिमित्त नगरच्या एसटी बसस्थानकातून जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, सावलीची व्यवस्था, तसेच दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सुविधा ट्रस्टच्या वतीने पुरविल्या जातील. दुसऱ्या दिवशी (ता. २१) कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे. यामध्ये महेश फुलमाळी, भरत होळकर, मनोहर कर्डिले, महेश वाघमोडे यांबरोबरच अनेक मल्ल सहभागी होणार आहेत. कुस्त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.