Kalicharan Maharaj : शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

Kalicharan Maharaj : शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

0
Kalicharan Maharaj : शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज
Kalicharan Maharaj : शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

Kalicharan Maharaj : नगर : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. राजकीय (Political) व्यक्ती पुतळा (Statue) तयार करत नसल्याने त्यांची चूक नाही. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही, असे मत कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा: वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

निलेश लंके प्रतिष्ठान दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती

निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालीचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरून संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.

अवश्य वाचा: अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीची पोलीस संरक्षणाची मागणी

कालीचरण महाराज म्हणाले, (Kalicharan Maharaj)

या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांचो योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे. यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही. राजकीय व्यक्ती स्वतः मूर्तिकार नाही. त्यांनी कामे दिली मात्र संबंधितांनी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर यामध्ये दोषी आहे, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी दिली.