Kalicharan Maharaj : हिंदू जागृत झाला नाही तर त्याचा विनाश नक्की : कालीचरण महाराज

Kalicharan Maharaj : हिंदू जागृत झाला नाही तर त्याचा विनाश नक्की : कालीचरण महाराज

0
Kalicharan Maharaj

Kalicharan Maharaj : श्रीरामपूर : हिंदू हा धर्माबद्दल (Hinduism) जागृत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. हिंदू जर जागृत झाला नाही, तर त्याचा विनाश नक्की आहे, असा धोक्याचा इशारा (Warning) देत, कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी हिंदू (Hindu) धर्मासाठी प्रत्येक हिंदूंनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन केले.

नक्की वाचा: मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण; पोलीस अधीक्षकांना निवेदन

कालीचरण महाराजांच्या उपस्थितीमध्ये धर्मसभेचे आयोजन

श्रीक्षेत्र सरला बेटचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगला देशामध्ये हिंदू समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील श्रीराम मंदिर चौक येथे समस्त वारकरी सांप्रदाय, हिंदु रक्षा कृती समिती, श्रीरामपूर यांच्या वतीने धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कालीचरण महाराज उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिश्‍चंद्रगिरी महाराज होते.  वारकरी संप्रदायाचे उत्तम महाराज गाडे, बाळासाहेब महाराज रंजाळे, गोवर्धन गिरी महाराज, मधुसूदन महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, कृष्णाजी महाराज वाघोले, कृष्णाजी महाराज  कुंजे, बाबा महाराज उंडे,  प्रकाश चित्ते, देविदास चव्हाण, बाबा शिंदे, शिवप्रतिष्ठानचे प्रवीण पैठणकर आदींसह श्रीरामपूर शहर, तालुक्यासह शेजारील तालुक्यातील हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. यावेळी कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मेनरोड, शिवाजी रोड ते श्रीराम मंदिर चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

अवश्य वाचा: मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, (Kalicharan Maharaj)

हिंदूमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव आहे. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही, त्यामुळे त्यांना धर्माबद्दल काहीच माहित नाही, सध्याच्या काळात त्यांना धर्मशिक्षण देणे गरजेचे आहे. तुमच्या पुढच्या पिढीला धर्माबद्दल सांगितले नाही तर विनाश नक्की आहे. त्यामुळे धर्माचे रक्षण करा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी उपस्थितांना केले. भाजपचे प्रकाश चित्ते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.